संजूचा लाख मोलाचा सल्ला धुडकावला, अभिषेक शर्मानं इंग्रजांना हवं तेच केलं, वानखेडेवर नेमकं काय घ

अभिषेक शर्मा IND विरुद्ध ENG T20 विश्वचषक उपांत्य फेरी 2026 : वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड या अत्यंत महत्त्वाच्या सेमीफायनल सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली आहे. सलामीवीर अभिषेक शर्मा स्वस्तात बाद झाल्याने भारताला पहिला मोठा धक्का बसला आहे. आक्रमक खेळण्याच्या नादात अभिषेकने आपली विकेट गमावली, ज्यामुळे आता त्याच्या खेळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

नेमकं काय घडलं?

आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला आणि भारताला सुरुवातीलाच विकेट गमवावी लागली. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू विल जॅक्स याने टाकलेल्या चेंडूवर अभिषेकने आक्रमक फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू नीट टाइम न झाल्याने तो थेट फिल सॉल्टच्या हातात गेला. सॉल्टने झेल टिपताच इंग्लंडच्या खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला. अभिषेक शर्माने आपल्या छोट्या खेळीत 7 चेंडूत 9 धावा केल्या. या डावात त्याने 2 चौकार लगावले, मात्र मोठी खेळी उभी करण्यात तो अपयशी ठरला.

संजूचा सल्ला दुर्लक्षित?

मैदानावर उपस्थित असलेल्या माहितीनुसार, नॉन-स्ट्रायकर एंडला असलेल्या संजू सॅमसनने त्याला एकेरी धाव घेऊन खेळण्याचा सल्ला दिला होता, मात्र अभिषेकने तो धुडकावून लावत विकेट बहाल केली.

सूर्यकुमार यादव काय म्हणाला?

सूर्यकुमार यादव म्हणाला की, आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करत होतो. सेमीफायनल आहे, मोठा सामना आहे आणि वारा देखील आहे. दव फारसे पडेल असे वाटत नाही. विकेट चांगली दिसतेय, सर्व क्युरेटर्स आणि ग्राउंड्समन यांना श्रेय द्यायला हवं.

भारतीय संघाची प्लेइंग-11 : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

इंग्लंड संघाची प्लेइंग-11 : फिलिप सॉल्ट, जोस बटलर, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, टॉम बंटन, सॅम करन, विल जॅक, जेमी ओव्हरटन, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद.

हे ही वाचा –

IND vs ENG T20 World Cup Semi Final : आम्हाला आधी बॅटिंगच हवी होती…; सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध नाणेफेक हरल्यानंतर कर्णधार सूर्या काय म्हणाला?, पाहा टीम इंडियाची प्लेइंग-11

आणखी वाचा

Comments are closed.