IND vs ENG: संजू सॅमसनने बदलला टीम इंडियाचा इतिहास! रोहित शर्माचा ‘तो’ मोठा विक्रम मोडत टी-20 वर्ल्ड कपमध्ये केला खळबळजनक पराक्रम

भारतीय फलंदाज संजू सॅमसनने (Sanju Samson) नवा इतिहास रचला आहे. एकाच टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार ठोकणारा तो पहिला फलंदाज बनला आहे. याआधी हा विक्रम माजी कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर होता, ज्याने 2024 च्या वर्ल्ड कपमध्ये 15 षटकार मारले होते. संजूने आता त्याला मागे टाकले असून या स्पर्धेत त्याने आतापर्यंत एकूण 16 षटकार लगावले आहेत.

एकाच टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय फलंदाज:
संजू सॅमसन: 16 (2026)
रोहित शर्मा: १५ (२०२४)
शिवम दुबे: १५ (२०२६)
इशान किशन: १४ (२०२६)
हार्दिक पांड्या: १४ (२०२६)
युवराज सिंग: १२ (२००७)

मुंबईत इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सेमीफायनलमध्ये संजू सॅमसन जबरदस्त फॉर्मात दिसला. त्याने केवळ 42 चेंडूत 89 धावांची खेळी केली. त्याचा स्ट्राईक रेट 211.90 इतका होता आणि त्याने आपल्या खेळीत 8 चौकार व 7 देखणे षटकार ठोकले.

टॉस हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 ओव्हर्समध्ये 253 धावा केल्या आणि इंग्लंडला विजयासाठी 254 धावांचे आव्हान दिले आहे. टीम इंडियासाठी संजू सॅमसन 89, शिवम दुबे 43, ईशान किशन 39 धावा केल्या. तसेच इंग्लंडकडून विल जॅक्स आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर जोफ्रा आर्चरला 1 विकेट मिळाली.

Comments are closed.