IND vs ENG: 8 चौकार, 7 षटकार.., संजू सॅमसनचं इंग्लंडविरुद्ध तुफान! विराट कोहलीच्या ऐतिहासिक विक्रमाशी केली बरोबरी

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी अक्षरशः वादळ आणलं. सुरुवातीपासूनच टीम इंडियाचे फलंदाज आक्रमक पवित्र्यात होते. यामध्ये पुन्हा एकदा संजू सॅमसनचे (Sanju Samson breaks Virat Kohli’s record) योगदान सर्वात मोठे ठरले. त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांची दाणादाण उडवत नॉकआउट सामन्यात 89 धावांची झंझावाती खेळी केली.
संजूने या खेळीत 8 चौकार आणि 7 षटकार ठोकले. 211 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत त्याने इतिहास रचला असून विराट कोहलीच्या एका मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
संजू सॅमसनने इंग्लंडविरुद्ध 42 चेंडूत 89 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये डोंगराएवढी धावसंख्या उभी केली. यासह संजू आता टी-20 वर्ल्ड कपच्या नॉकआउट सामन्यात भारतासाठी सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी विराट कोहलीने 2016 च्या सेमीफायनलमध्ये 89 धावांची खेळी केली होती. मात्र, संजूचा स्ट्राईक रेट विराटपेक्षा कितीतरी पटीने जास्त होता.
भारतीय संघाने या सामन्यात घातक फलंदाजी करत 20 ओव्हर्समध्ये 253 धावांचा डोंगर उभा केला आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील ही कोणत्याही संघाची सर्वोच्च धावसंख्या आहे. या सामन्यात ईशान किशन 18 चेंडूत 39 धावा, शिवम दुबे 25 चेंडूत 43 धावा, केल्या.
भारतीय संघ टी-20 मध्ये दोनदा 250+ धावा करणारा पहिला संघ बनला आहे. भारतीय फलंदाजांनी या सामन्यात एकूण 19 षटकार मारले, जो एका सामन्यातील नवा विक्रम आहे.
Comments are closed.