संजू सॅमसनचा CSK मध्ये प्रवेश पक्का! धोनीच्या जिगरीसोबत मोठा ट्रेड, डील अंतिम टप्प्यात

इंडियन प्रीमियर लीग IPL 2026 साठी संजू सॅमसनचा ट्रेड आता जवळपास निश्चित मानला जात आहे. मागील सीझनपर्यंत संजू राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता, मात्र आयपीएल 2025 संपताच त्याच्या टीम बदलण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आता क्रिकबजच्या अहवालानुसार, संजू सॅमसनची चेन्नई सुपर किंग्स (CSK) सोबत ट्रेड डील अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा होऊ शकते.

अहवालानुसार, संजूच्या बदल्यात रविंद्र जडेजा आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांचा समावेश असलेला मोठा ट्रेड होऊ शकतो. जर हा करार पूर्ण झाला, तर हा IPL इतिहासातील सर्वात मोठ्या ट्रेड डीलपैकी एक मानला जाईल. याआधी चर्चा होती की संजूचा दिल्ली कॅपिटल्ससोबत ट्रिस्टन स्टब्सच्या बदल्यात व्यवहार होऊ शकतो, परंतु आता CSKने सॅमसनवर जवळपास शिक्कामोर्तब केलेय.

माजी कर्णधार आणि दिग्गज विकेटकीपर धोनी आता करिअरच्या अंतिम टप्प्यात आहे. CSK च्या सीईओने नुकतेच सांगितले की धोनी आयपीएल 2026 मध्ये खेळेल, पण तो किती सामने खेळू शकेल हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल. धोनीने अनेक वेळा स्पष्ट केले आहे की फिटनेस साथ देईल तोपर्यंत तो सीएसकेसाठी खेळेल.

अशा परिस्थितीत सीएसके मध्ये संजू सॅमसन येत असल्यास तो धोनीच्या विकेटकीपिंगच्या भूमिकेची जागा घेणारा प्रमुख पर्याय ठरू शकतात. संजू हा फक्त उत्कृष्ट विकेटकीपर नव्हे तर टॉप ऑर्डरमध्ये आक्रमक खेळ करणारा फलंदाज म्हणूनही ओळखला जातो. शिवाय, संजूचा आयपीएलमधील विक्रमसुद्धा प्रभावी राहिला आहे.

जर जडेजाचा समावेश या ट्रेड डीलमध्ये झाला, तर त्याची राजस्थान रॉयल्समध्ये पुनरागमन होईल. जडेजाने आपल्या आयपीएल करिअरची सुरुवात 2008 मध्ये राजस्थानसोबतच केली होती आणि त्यावर्षी शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थानने पहिला आयपीएल किताब जिंकला होता. त्यानंतर जडेजा सीएसके मध्ये दाखल झाला.

आता मात्र, संजू सीएकेमध्ये प्रथमच खेळताना दिसू शकतो, तर जडेजाची करिअरमधील पहिली टीम असलेल्या राजस्थानमध्ये पुनरागमन होण्याची शक्यता आहे. हा ट्रेड अधिकृत होताच आयपीएल जगतात मोठी खळबळ उडण्याची चिन्हे स्पष्ट आहेत.

Comments are closed.