INDvsWI: संजू सॅमसनने गुडघ्यावर बसून का केले सेलिब्रेशन? सामन्यानंतर केले स्पष्ट

भारताने आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६च्या उपांत्य फेरीत धमाक्यात प्रवेश केला आहे. रविवारी (२ मार्च) वेस्ट इंडिजविरुद्ध झालेला सुपर-८चा सामना भारताने ५ विकेट्सने जिंकला. भारताच्या या विजयाचे श्रेय संजू सॅमसनला जाते त्याने १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नाबाद ९७ धावा (५० चेंडू) केल्या. त्याने शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्याच चेंडूवर चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर त्याने केलेले सेलिब्रेशन मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. त्याच्या या सेलिब्रेशनमागचे सत्य समोर आले. आहे.
संजूने त्याचे हे सेलिब्रेशन वैयक्तिक ठेवले आहे. तो शतक करू शकला नसला तरी त्याची ही खेळी काही कमी नाही. विजयी चौकार मारल्यावर तो गुडघ्यावर बसला, त्याने आकाशाकडे पाहिले आणि देवाला धन्यवाद केले. त्याचे हे सेलिब्रेशन चांगलेच व्हायरल झाले.
संजूने केलेले सेलिब्रेशन चांगलेच चर्चेत आले, मात्र त्याने त्याचे अधिक स्पष्टीकरण देणे टाळले. त्याने हे शब्दांत सांगण्याऐवजी तो डाव खेळणे आणि तो क्षण किती महत्वाचा होता हे स्पष्ट केले. “हा माझ्यासाठी विशेष क्षण आहे. मला त्याच्यावर विश्वास असून मला हे प्रायवेट ठेवायचे आहे”, असे संजूने जियोहॉटस्टारवर पार्थिव पटेलला सांगितले आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या एका बाजूने विकेट्स पडत राहिल्या, मात्र संजू दुसरी बाजू लढत राहिला. त्याने म्हटले, “धावांचा पाठलाग करताना आक्रमकपणाऐवजी नियंत्रण, स्पष्टता आणि जबाबदारीची आवश्यकता होती.
आमच्या फलंदाजीकडे पाहिले तर १९० धावांचा पाठलाग ईडन गार्डन्सवर करणे शक्य आहे, असे मला वाटले. जेव्हा दव (dew) आले तेव्हा फलंदाजी करणे सोपे झाले, मात्र विकेट्स पडत राहिल्याने थोड्या अडचणी आल्या.”
संजूने या सामन्यात त्याच्या खेळीमध्ये थोड बदल केला असल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला, ” प्रथम फलंदाजी करताना तुम्हाला मोठे लक्ष्य ठेवायचे असते. तेव्हा मी सर्वाधिक षटकार मारण्याचा प्रयत्न करतो, मात्र जेव्हा अशा प्रकारच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याची वेळ येते तेव्हा वेगळा अप्रोच असतो. तेव्हा तुम्ही स्थिती पाहता मोठे शॉट्स खेळत जोखीम घेण्याऐवजी चौकार मारण्याचा प्रयत्न असतो. तसेच मी केले आहे.”
अनेकदा अपयशी ठरल्यानंतर आणि मनाने खचून गेल्यानंतर त्यामध्ये सुधारणा करत केलेली ही खेळी संजूच्या कारकिर्दीतील महत्वाची खेळी ठरली आहे. त्याने उत्तम खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आणि ईश्वराचे आभार मानले. हा विजय मिळवताच भारताने उपांत्य फेरीत विक्रमी सहाव्यांदा प्रवेश केला आहे. तो सामना ५ मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तेथे भारत इंग्लंडशी भिडणार आहे.
Comments are closed.