अपमानाचा बदला शतकाने! सलग 3 फ्लॉप शोनंतर संजूचा ‘विराट’ अवतार; यलो जर्सीत ठोकलं पहिलं तुफानी शत
संजू सॅमसनचे पहिले शतक CSK IPL 2026 : संजू सॅमसनने आयपीएल 2026 मध्ये इतिहास रचत पहिलं शतक झळकावलं आहे. शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली. सॅमसनने अवघ्या 52 चेंडूत शतक पूर्ण करत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात जलद सेंचुरीची नोंद केली. विशेष म्हणजे, चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळताना त्याचं हे पहिलंच शतक ठरलं आहे.
स्ट्रोक भरले 👌👌
संजू सॅमसन पॉवरप्लेला पूर्ण प्रभाव पाडत आहे 💛
अपडेट्स ▶️ https://t.co/BzGc6O65jX #TATAIPL | #खेळबिंदास | #CSKvDC | @IamSanjuSamson | @ChennaiIPL pic.twitter.com/vH2jZFj6oU
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) 11 एप्रिल 2026
IPL 2026 मधील पहिलं शतक (Sanju Samson first Century in IPL 2026) आयपीएल 2026 मधील पहिलं शतक सॅमसनच्या नावावर नोंदवलं गेलं आहे. यापूर्वी या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या के.एल. राहुलच्या नावावर होती (92 धावा). तसेच समीर रिझवी यानेही 90 धावांची खेळी केली होती. मात्र, शतकाचा मान सॅमसनने पटकावला.
सर्वात जलद शतकाचा विक्रम (Sanju Samson Fastest Century in IPL)
या सामन्यात सॅमसनने 52 चेंडूत शतक झळकावत स्वतःचाच विक्रम मोडला. याआधी त्याचं सर्वात जलद शतक 2019 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना पंजाब किंग्सविरुद्ध 54 चेंडूत आलं होतं. तसंच, चेन्नई सुपर किंग्ससाठी हे पाचवं सर्वात जलद शतक ठरलं. सीएसकेसाठी सर्वात जलद शतकाचा विक्रम अजूनही मुरली विजयच्या नावावर कायम आहे. त्यांनी 2010 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध अवघ्या 46 चेंडूत शतक झळकावलं होतं.
स्नायू स्मृती! 💪💯#व्हिसलपोडू #CSKvDC pic.twitter.com/D8UC7mHnck
— चेन्नई सुपर किंग्स (@ChennaiIPL) 11 एप्रिल 2026
टीकाकारांना दिलं जोरदार उत्तर
आयपीएल 2026 मध्ये सॅमसनची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली होती. पहिल्या तीन डावांत त्याने फक्त 6, 7 आणि 9 अशा मिळून 22 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका होत होती. मात्र, दिल्लीविरुद्धच्या या दमदार शतकी खेळीनं सॅमसनने टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आणि पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली.
हे L100N's डेन आहे! 🦁💯#व्हिसलपोडू #CSKvDC pic.twitter.com/bNXimdMQ17
— चेन्नई सुपर किंग्स (@ChennaiIPL) 11 एप्रिल 2026
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.