आशिया कपच्या तोंडावर टीम मॅनेजमेंटचं टेन्शन वाढलं, टीम इंडियाचा सलामीवीर दुखापतग्रस्त, सराव सत्
एशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसन फिटनेसची चिंता: आशिया कप 2025 च्या सुरुवातीआधीच भारतीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चर्चा संजू सॅमसनची रंगली आहे. संघाच्या घोषणेनंतर जवळजवळ रोजच त्याच्याबाबत एखादी तरी बातमी समोर येत आहे. मात्र आता स्पर्धा सुरू होण्याच्या केवळ काही दिवस आधी सॅमसनच्या फिटनेसविषयी चिंताजनक बातमी समोर आली असून टीम इंडियाची काळजी वाढवणारी ठरली आहे.
सराव सत्रात नेमकं काय घडलं?
टीम इंडियाचा पहिला सामना सुरू होण्याच्या 4 दिवस आधीच सॅमसन सराव सत्रात दुखापतीच्या समस्येत दिसला. नेट्समध्ये सराव सुरू असताना त्याला चालण्यात अडचण होत असल्याचे स्पष्ट दिसले. भारतीय संघ 4 सप्टेंबर रोजी दुबईला पोहोचला आणि 5 तारखेपासून सरावाला सुरुवात केली. पहिल्या दिवसात काही त्रास दिसला नाही. मात्र 6 सप्टेंबरला आयसीसी अकॅडमीत झालेल्या सराव सत्रात सॅमसनच्या उजव्या पायात काही त्रास असल्याचे जाणवले. तो हलक्या वेदनेत दिसला आणि चालताना लचकताना दिसला.
पहिल्या सामन्यापर्यंत फिट होणार का?
रिपोर्टनुसार, इतर खेळाडू नेट्समध्ये सराव करत असताना सॅमसन बाजूला फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांच्यासोबत प्रॅक्टिस करत होता. काही वेळानंतर त्याने थ्रो-डाउन सुरू केले. सुमारे 10-12 थ्रो-डाउननंतरच त्याने सराव थांबवला. गेल्या वर्षभरात सॅमसन उत्तम फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच झालेल्या केरळ क्रिकेट लीगमध्ये त्याने फक्त 5 डावांत 30 षटकार ठोकले होते. त्यामुळे आशिया कपसाठी तो संघाच्या योजनांमध्ये महत्त्वाचा मानला जात होता. आता मात्र त्याच्या फिटनेसने टीम मॅनेजमेंटला धडकी भरवली आहे.
Sportsports yaari अन एक्सक्लुझिव्ह
हृदयविकाराचा हावभाव! 💙 सुरकुमार यादव आणि संजू सॅमसन सरावानंतर ऑटोग्राफवर स्वाक्षरी करतात #स्युरिकुमेरादव #Hardikpandya #Sanjusamson #Asiacup2025 pic.twitter.com/lcqy6tu481– क्रीडा यारी (@यारिस्पोर्ट्स) 6 सप्टेंबर, 2025
भारतीय संघाचा पहिला सामना 10 सप्टेंबरला UAE विरुद्ध आहे. त्यामुळे सॅमसन आणि टीम इंडिया दोघांनाही हीच अपेक्षा आहे की तोपर्यंत तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊन मैदानात उतरेल.
आशिया कप 2025 साठी टीम इंडियाचा संघ – (Team India Squad For Asia Cup 2025)
फलंदाज : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग.
अष्टपाई: हार्दिक पांड्या, शिवम दुबे, क्षरा पटेल.
यष्टिरक्षक : संजू सॅमसन, जितेश शर्मा.
गोलांडज: जसप्रीत बुमराह, वरुना चक्रवर्ती, अर्शदिप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.