फरहान, सॅमसन इन, अभिषेक, वरुण आऊट…; आयसीसीने ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली
T20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेतील आयसीसी संघ: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या (T20 World Cup 2026) अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड (Ind vs NZ Final) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने तब्बल 96 धावांनी विजय मिळवला. भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. आयसीसी टी-20 विश्वचषक लागोपाठ दुसऱ्यांदा आणि आजवर तिसऱ्यांदा जिंकणारा टीम इंडिया हा पहिला संघ ठरला. टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेनंतर आता आयसीसीकडून टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा करण्यात आली आहे. (icc team of the tournament of t20 world cup 2026)
आयसीसीने स्पर्धेतील सर्वोत्तम म्हणजेच टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा (icc team of the tournament of t20 world cup 2026) केली आहे. या संघात भारताचे सर्वाधिक चार खेळाडू आहेत. यामध्ये संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांचा समावेश आहे. तर विश्वचषक 2026 च्या स्पर्धेत 14 विकेट्स पटकावणाऱ्या टीम इंडियाचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला आयसीसीकडून स्थान देण्यात आलेले नाही. तर अभिषेक शर्माला देखील टीम ऑफ द टूर्नामेंटसाठी निवडण्यात आलेले नाही. आयसीसीने विश्वचषक 2026 च्या स्पर्धेतील टीम ऑफ द टूर्नामेंटची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. यामध्ये कुणाकुणाला संधी देण्यात आली आहे, जाणून घ्या…
T20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेतील आयसीसी संघ
- साहिबजादा फरहान
- संजू सॅमसन (यष्टीरक्षक)
- इशान किशन
- एडन मार्कराम (कर्ंधर)
- हार्दिक पंड्या
- विल जॅक
- जेसन धारक
- जसप्रीत बुमराह
- लुंगी ngidi
- आदिल रशीद
- आशीर्वाद मुजरबानी
- शॅडली व्हॅन शाल्कविक (राखीव खेळाडू)
मधील प्रत्येक वळणावर सामना-विजेते #T20WorldCup स्पर्धेतील संघ 📝
अधिक 👇https://t.co/VsrNEAGyIl
— ICC (@ICC) 10 मार्च 2026
भारताकडून 4 जणांना संधी- (ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026)
संजू सॅमसनने पाच सामन्यांमध्ये 199 च्या स्ट्राईक रेटने 321 धावा केल्या. जसप्रीत बुमराहने स्पर्धेत 14 विकेट्स घेतल्या, ज्यात अंतिम सामन्यातील चार विकेट्सचा समावेश आहे. हा टी-20 विश्वचषक इशान किशनसाठी देखील उल्लेखनीय होता. इशान किशनने तीन अर्धशतके आणि 193 च्या स्ट्राईक रेटसह 317 धावा केल्या. पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात इशानने भारताकडून 77 धावा केल्या. त्याने अंतिम सामन्यात अर्धशतकही झळकावले. हार्दिक पांड्याने 9 सामन्यात 217 धावा केल्या आणि 9 विकेट्स पटकावल्या.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.