IPL: राजस्थान रॉयल्सच्या नेतृत्वात बदल? संजू सॅमसनऐवजी हा युवा खेळाडू घेणार संघाची कमान!

आगामी आयपीएलच्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी राजस्थान राॅयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार संजू सॅमसन खेळण्याबाबत अजूनही पुष्टी झालेली नाही. दरम्यान आत्ताच आलेल्या अहावालानुसार, सेंटर ऑफ एक्सलन्सकडून अद्याप परवानगी न मिळाल्याने संजू सॅमसन आयपीएल 2025 मधील पहिल्या 3 सामन्यात केवळ फलंदाज म्हणून खेळणार आहे, दरम्या रियान पराग संघाची धुरा सांंभाळणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळताना संजू सॅमसनच्या तर्जनीला फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे, त्याला आयपीएल 2025 पूर्वी बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सने (पूर्वीचे एनसीए) फलंदाजीची परवानगी दिली होती. मात्र ताज्या अहवालानुसार आता तो सुरुवातीचे 3 सामन्यात कर्णधारपद स्वीकारणार नसल्याची माहिती समोर येत आहे. अशा परिस्थितीत संघाला धक्का बसला आहे. याबाबत राजस्थान राॅयल्सने आधिकृत माहिती दिली आहे.

आयपीएल 2025 साठी राजस्थान राॅयल्सचा संघ-

संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, रायन पॅराग, ध्रुव ज्युरेल, शिम्रॉन हेटमीयर, संदीप शर्मा, जोफ्रा आर्चर, महेश टिकसन, वानिंदु हदारंगा, अक्ष माधावल, कुमार कार्तिक्यान, नितिश राणा, युधू सूर्यावंशी, क्वेटन माफका, कोडियाना, अशोक शर्मा, तुषार देशपांडे, शुभम दुबे.

Comments are closed.