संजू सॅमसन नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी तयार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरला संदेश
संजा सॅमसन नवी दिल्ली: भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 19 ऑक्टोबरपासून जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 वनडे आणि 5 टी 20 सामने खेळले जातील. संजू सॅमसनला सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टी 20 संघात स्थान देण्यात आले आहे. आशिया चषक 2025 मध्ये संजू टीमचा भाग होता. संजूनं आशिया चषकात चांगल्या धावा केल्या. संजू सॅमसनला आशिया चषकात ओमानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आलं होतं. आशिया चषकात संजूच्या फलंदाजीच्या क्रमात अनेक बदल दिसून आले. संजूने टीम इंडियामध्ये आपल्या फलंदाजीच्या क्रमाबद्दल भूमिका मांडत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना थेट संदेश दिला आहे.
Sanju Samson : संजू नेमकं काय म्हणाला?
आशिया चषक 2025 यावेळी टी20 फॉरमॅटमध्ये खेळला गेला. शुभमन गिल बऱ्याच दिवसांपासून भारताच्या टी20 टीममधून बाहेर होता, तेव्हा संजू सॅमसन टीमसाठी सलामीला फलंदाजीला येत होता. पण, गिल परत येताच संजूला मधल्या फळीत आणले गेले आणि शुभमन गिल, अभिषेक शर्मा हे दोघे सलामीवीर बनले. आशिया चषकात संजू सॅमसनच्या फलंदाजीच्या क्रमात अनेकवेळा बदल दिसून आले.
संजू सॅमसनने CEAT क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्समध्ये सांगितले की, ‘जर तुम्ही मला 9 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी सांगितले किंवा मला लेफ्ट-आर्म-स्पिन गोलंदाजीसाठी सांगितले किंवा मला देशासाठी कोणतीही भूमिका दिली, तर मला त्यात काहीही वाईट वाटत नाही.’
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 वर्ष पूर्ण
संजू सॅमसन पुढे म्हणाला, ‘मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि मी या 10 वर्षात फक्त 40 सामने खेळले आहेत. खरं सांगायचं तर, हे आकडे सर्व गोष्टी सांगत नाहीत, पण आज मी जो माणूस बनलो आहे, त्याचा मला अभिमान आहे. मी ज्या आव्हानांना सामोरे गेलो, त्याचाही मला अभिमान आहे. आता मी बाहेरील चर्चेऐवजी माझ्या आतल्या आवाजावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे.’
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा टी 20 संघ
सूर्यकुमार यादव- कर्णधार, अभिषेक शर्मा, शुभमन गिल- उपकर्णधार,तिलक वर्मा,नितीश कुमार रेड्डी,शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीकरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर
पाच सामन्यांची टी 20 मालिका
29 ऑक्टोबर – पहिली टी20 (कॅनबेरा)
31 ऑक्टोबर – दुसरी टी20 (मेलबर्न)
2 नोव्हेंबर – तिसरी टी20 (होबार्ट)
6 नोव्हेंबर – चौथी टी20 (गोल्ड कोस्ट)
8 नोव्हेंबर – पाचवी टी20 (ब्रिसबेन)
आणखी वाचा
Comments are closed.