आयपीएल 2025 नंतर संजू सॅमसनला मिळाली नवी टीम, आता ‘या' संघासाठी खेळताना दिसणार
भारतीय खेळाडू संजू सॅमसनने (Sanju Samson) आयपीएल 2025 (IPL 2025) संपल्यानंतर एका महिन्यातच नवीन संघात प्रवेश केला आहे. संजू सॅमसन आता केरळ प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामात कोची ब्लू टायगर्ससाठी खेळताना दिसणार आहे. सॅमसन या लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. सॅमसनसाठी कोची संघाने आपल्या एकूण बजेटपैकी 50 टक्क्यांहून अधिक रक्कम खर्च केली आहे.
सॅमसन टी-20 क्रिकेटमधील जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये एक मानला जातो. त्याला टी-20 क्रिकेटचा खूप अनुभव आहे. संजू मागील 12 वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळत आहे. 2018 पासून तो राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे आणि 2021 पासून त्याने त्या संघाचे नेतृत्व केले आहे. संजू सॅमसनने भारतासाठी देखील 42 टी-20 सामने खेळले असून त्यामध्ये 3 शतके सामील आहेत.
या लीगच्या लिलावात सॅमसनची बेस प्राइस 3 लाख रुपये होती. पण कोचीच्या संघाने त्याला घेण्यासाठी तब्बल 26.80 लाख रुपये मोजले. या लिलावासाठी प्रत्येक संघाकडे फक्त 50 लाख रुपयांचे बजेट होते. कोचीने त्यांच्या पॉकेटमधील 50 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम सॅमसनवर खर्च केली. ही लीग 21 ऑगस्टपासून सुरू होऊन 6 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
क्रिकबझ रिपोर्ट्सनुसार संजू सॅमसन करारासाठी उपलब्ध असेल, तर चेन्नई सुपर किंग्स त्याला संघात घेण्याचा विचार करेल. हे ट्रेडमधून आयपीएल 2026 मेगा लिलावाच्या आधी किंवा नंतर होऊ शकते.
सीएसकेच्या एका अधिकाऱ्या कडून सांगण्यात आले की, आम्ही नक्कीच सॅमसनकडे लक्ष ठेवून आहोत. तो भारतीय फलंदाज आहे, जो यष्टीरक्षक आणि ओपनरदेखील आहे. त्यामुळे तो उपलब्ध असेल तर आम्ही नक्कीच त्याला संघात आणण्याचा पर्याय शोधू.
Comments are closed.