संजू सोडणार राजस्थानची साथ? आता 'हा' ओपनर सांभाळणार राजस्थान संघाचं कर्णधारपद
आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सला नवा कर्णधार मिळण्याच्या चर्चा जोर धरत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार संजू सॅमसनने राजस्थान फ्रँचायझीला कळवले आहे की तो संघ सोडू इच्छितो. अशीही बातमी आहे की यशस्वी जयस्वालला संघात टिकवण्यासाठी त्याला कर्णधारपदाची ऑफर देण्यात आली आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्स (CSK) सहित तीन संघ संजू सॅमसनला आपल्या टीममध्ये घेण्यास उत्सुक असल्याच्या चर्चा आहेत.
रिपोर्ट्सनुसार फक्त संजू सॅमसनच नव्हे, तर आणखी एक विकेटकीपर-फलंदाज ध्रुव जुरेल देखील राजस्थान रॉयल्सचा निरोप घेऊ शकतो. जुरेलने 2008 च्या आयपीएल विजेत्या संघाचा निरोप का घ्यायचा आहे, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. यशस्वी जयस्वाल देखील राजस्थान रॉयल्स संघ सोडणार होता, पण त्याला कर्णधारपदाचे आश्वासन देऊन थांबवण्यात आले आहे.
संजू सॅमसनबद्दल बोलायचे झाले तर चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ त्याला आपल्या टीममध्ये सहभागी करण्यास उत्सुक आहेत. मात्र, सॅमसनचा ट्रेड होणार की त्याच्यावर ऑक्शनमध्ये बोली लागणार, हे अजून स्पष्ट झालेले नाही.
संजू सॅमसन 2013 ते 2015 दरम्यान आणि नंतर 2018 पासून आतापर्यंत राजस्थान रॉयल्स संघासाठी खेळत आहे. त्याच्या आयपीएल कारकिर्दीतल्या 177 सामन्यांमध्ये त्याने एकूण 4,704 धावा केल्या आहेत. यात 3 शतक आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. सॅमसनने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससह दिल्ली कॅपिटल्स (पूर्वीचे दिल्ली डेअरडेव्हिल्स) संघासाठीही खेळ केले आहेत.
Comments are closed.