संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन, वाल्मीक कराडवर मकोका लावण्याची मागणी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी वाल्मीक कराड आणि सात जणांना अटक करण्यात आली आहे. या सात आरोपींवर मकोका लावण्यातआला आहे. पण मुख्य आरोपी वाल्मीक कराडवर मकोका लावण्यात आलेला नाही. यासाठीच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख हे गावतील पाण्याच्या टाकीवर पोहोचले आहेत. वाल्मीक कराडवर मकोका लावावा अशी मागणी त्यांनी केली आहे. धनंजय देशमुख हे आधी मोबाईल टॉवरवर चढून हे आंदोलन करणार होते. पण पोलिसांनी या टॉवरभोवती सुरक्षा वाढवली. त्यानंतर धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढले आणि आंदोलन सुरू केले.
दुसरीकडे गावकऱ्यांनीही धनंजय देशमुख यांच्या आंदोलनाला साथ दिली आहे. वाल्मीक कराडला मकोका लागलाच पाहिजे अशी घोषणाबाजी गावकऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी केली आहे.
जरांगे पाटील आंदोलनाच्या ठिकाणी
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी धनंजय देशमुख यांना खाली उतरण्याची विनंती केली आहे. पण धनंजय देशमुख आपल्या मागणीवर ठाम आहेत.
Comments are closed.