पाच गोपनीय साक्षीदारांचा जबाब अन् वाल्मिक कराडच्या टोळीचा पर्दाफाश; संतोष देशमुखांना मारहाणीचा
<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;"> बीड: <एक शीर्षक ="बीड" href ="https://marathi.tezzbuzz.com/bed" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रखरणात आता पोलिसांनी दाखल केलेलं आरोपपत्र एबीपी माझाच्या हाती आलं आहे. त्या आरोपपत्रानुसार वाल्मीक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सूत्रधार असल्याचं पोलिसांच्या आरोप पत्रात स्पष्ट केलं आहे. आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या वादामधून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं या आरोप पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे, खंडणी, ॲट्रॉसिटी, हत्या या तिन्ही घटनांचा आरोप पत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे. 29 नोव्हेंबरला सुदर्शन घुलेच्या फोनवरून वाल्मीक कराडने खंडणी मागितली होती आणि सहा तारखेला संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळे यांच्यासोबत वाद झाला होता असे या आरोप पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. तर वाल्मिक कराडच्या विरोधातील सर्व पुरावे पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानुसार त्याच्या विरोधामध्ये पोलिसांनी सर्व पुरावे गोळा केलेले आहेत. संतोष देशमुख यांना संतोष घुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सीआयडीला मिळाला आहे.
पाच साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना पाच महत्त्त्वाचे साक्षीदार सापडले आहेत. हे पाचही साक्षीदार गोपनीय आहेत. याच साक्षीदारांच्या जबाबानंतर पोलिसांनी वाल्मिक कराडविरोधात सर्व गुन्हे गोळा केलेले आहेत. खंडणी, अॅट्रॉसिटी आणि संतोष देशमुख यांची हत्या या तिन्ही गुन्ह्यांचा एकत्रितपणे उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यानुसार वाल्मिक कराड हा या प्रकरणाचा सूत्रधार आहे.
सुदर्शन घुले याने वाल्मिक कराड याला फोन केला होता. त्यावेळी वाल्मिक कराड याने सुदर्शन घुले याला सांगितले की, जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण कुणालाही सोडणार नाही. सुदर्शन घुले आणि कराड यांच्यात हा संवाद झाल्यानंतर घुले याने लवादा या कंपनीत परत कॉल केला आणि धमकी दिली. एकूण पाच साक्षीदारांपैकी एक साक्षीदार हा सुदर्शन घुले याच्यासोबत होता. नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगा येथे विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांची एक भेट झाली होती. या भेटीत विष्णू चाटे याने घुले यास वाल्मिक कराडचा निरोप दिला होता. संतोष देशमुख हा आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असा हा संदेश होता, असे पोलिसांनी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात नमूद आहे.
संतोष देशमुखांना घुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सीआयडीकडे
पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रामध्ये सर्व बाबींचा समोवेश करण्यात आला आहे. संतोष देशमुख यांची हत्या ही खंडणीच्या वादामधून झाल्याचे आरोपपत्रातून सिद्ध झालं आहे. आवादा कंपनीकडे खंडणी मागितली होती आणि या खंडणीनंतर झालेल्या वादामध्ये संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. 29 नोव्हेंबर रोजी सुदर्शनच्या फोनवरूनच वाल्मीक कराडने खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर सहा डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळे याच्याशी वाद झाला होता. ही माहिती आता पाच गोपनीय साक्षीदारांच्या बाबानंतर कराडविरुद्ध पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणांमध्ये वाल्मीक कराड हाच प्रमुख सूत्रधार असल्याचे स्पष्ट झालं आहे. गेल्या प्रत्येक दिवसांपासून खंडणी ॲट्रॉसिटी आणि हत्या या प्रकरणावरून अवघा महाराष्ट्रात राज्याचे राजकारण ढवळून निघालं आहे. त्यामुळे आरोपपत्रामध्ये तिन्ही घटनांचा एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सुद्धा सीआयडीच्या हाती लागला आहे.
आरोपींमध्ये चार्जशीटमध्ये कोणाचा कितवा नंबर
वाल्मिक कराड – एक नंबर
विष्णू चाटे- दोन नंबर
सुदर्शन घुले – तीन नंबर
प्रतीक घुले – चार नंबर
सुधीर सांगळे – पाच नंबर
महेश केदार – सहा नंबर
जयराम चाटे – सात नंबर
फरार कृष्णा आंधळे – आठ नंबर
Comments are closed.