वाल्मीक कराडने एकदा नव्हे, सहा वेळा खंडणी मागितली!

संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रमुख सूत्रधार असलेल्या वाल्मीक कराडने अवादा कंपनीकडे एकदा नव्हे, तर तब्बल सहा वेळा दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, असे पंपनीच्या अधिकाऱ्याने नोंदवलेल्या जबाबातून समोर आले आहे. याच जबाबात सुदर्शन घुलेचाही उल्लेख करण्यात आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास यंत्रणांनी नुकतेच न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात अवादा पंपनीच्या अधिकाऱ्यांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत.

Comments are closed.