कारागृहात वाल्मीक कराडला नवी डिश टीव्ही, व्हीआयपी सुविधा; कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक असलेल्या आणि सध्या बीड कारागृहात बंद असलेल्या वाल्मीक कराडची चांगलीच ऊठबस केली जात असून कराडला नवीन डिश टीव्ही आणि व्हीआयपी सुविधा मिळत आहे, अशी माहिती समोर आली आहे. बीड कारागृहात कैदी असलेल्या सनी आठवलेची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली असून या क्लिपमध्ये कराडचा दबदबा असल्याचे सनी आठवले म्हणत आहे.
सलग दोन दिवस अझहर पठाण नावाच्या एका पैद्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती. या रेकॉर्डिंगमध्ये तो म्हणतोय की, वाल्मीक कराडच्या गँगकडून आपल्याला अमानुष मारहाण करण्यात आली. या कॉल रेकॉर्डिंगनंतर आता सनी आठवले या दुसऱ्या पैद्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. बीड कारागृहात आपल्याला मारहाण झाली असून माझा खांदा निखळला आहे. याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी तो या कॉल रेकॉर्डिंगमधून करत असल्याचे दिसत आहे.
काय आहे व्हायरल कॉल करा रेकॉर्डिंगमध्ये?
सनी आठवलेच्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये अझहर पठाणला मारहाण झाली. त्याचे सगळे स्टेटमेंट बदलले आहेत. वाल्मीक कराडचा रात्री साडेआठ वाजता जबाब घेतला. रात्री 9 वाजता बॅरेक क्रमांक तीनमध्ये आणले. सगळे अधिकारी त्याच्यावर दबाव आणतात. 10 हजार रुपयांची पॅन्टीन देतो, बाहेर गेल्यानंतर पैसे देईन, असे आमीष कराडने दिले आहे. वाल्मीक कराडने आणि त्याच्या गँगने खोटे गुन्हे दाखल करून लोक मारले. आता ते माझ्या जेलच्या बदलीच्या मागे लागलेत. त्याच्याकडे किती आणि कोणाच्या नावावर सिमकार्ड आहेत, हे मला माहीत आहे. त्याला कोण पॅन्टीन देतो, कोण पैसे देतो, कोण पैसे घेतो हे मला माहीत आहे. सगळं जेल प्रशासन वाल्मीक कराडच्या जिवावर चालले आहे, असे म्हटले आहे.
Comments are closed.