वाल्मीक कराडच खरा सूत्रधार, संतोष देशमुख खून प्रकरणात सीआयडीकडून 1800 पानांचं आरोपपत्र दाखल
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात सीआयडीने 1800 पानांचे आरोपपत्र दाखल केले असून वाल्मीक कराड हाच खरा सूत्रधार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. आवादी कंपनीकडून खंडणी उकळण्यात अडथळा ठरत होता म्हणून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचे सीआयडीने आरोपपत्रात म्हटले आहे. तसेच खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या या तीनही घटनांचा आरोपपत्रामध्ये एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे.
Comments are closed.