Santosh Deshmukh Murder Case 1500 chargesheet filed with photos during murder


मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले होते. या हत्येमधील आरोपी वाल्मीक कराडला अटक करण्यात आली. तसेच, अद्याप संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे या आरोपीचा शोध अजूनही सुरू आहे. असे असताना आता सीआयडीने 1500 पानाचे आरोपपत्र दाखल करण्यात आला असून यामध्ये 8 आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे या आरोपपत्रातून काही फोटो समोर आले आहेत, ज्यामुळे या आरोपींनी क्रौर्याची परिसीमा पार केल्याचे समोर आले आहे. हे फोटो सीआयडीच्या हाती लागलेल्या व्हिडीओतून काढण्यात आलेल्या स्क्रीनशॉट जोडण्यात आले आहेत. हे फोटो माध्यमात आल्यानंतर महाराष्ट्रामधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. (Santosh Deshmukh Murder Case 1500 chargesheet filed with photos during murder)

हेही वाचा : Supplementary Demands : पंतप्रधान आवास योजनेसाठी 3 हजार 752 कोटी, 6 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर 

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने 1500 पानांचे आरोपपत्र दाखल केले असून यामध्ये 8 आरोपींची नावे आहेत. यामध्ये जोडलेल्या फोटोमधून या घटनेची क्रूरता लक्षात येत असून यातील काही फोटो हे माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. पण, हत्या प्रकरणात जे फोटो समोर आले आहेत ते पाहताना अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान, सीआयडीने आरोपपत्रात एक व्हिडीओ जोडण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हत्या करतानाच हा लाईव्ह व्हिडीओ शेअर करण्यात आल्याचे सांगितले गेले. आरोपींच्या ‘मोकारपंथी’ या नावाच्या व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये फोटो, व्हिडीओ टाकण्यात आले. सीआयडीने हे फोटो, व्हिडीओ ताब्यात घेतले असून पुराव्यांच्या यादीमध्ये हे फोटो समाविष्ट करण्यात आले आहेत.

सीआयडीने जोडलेल्या संबंधीत व्हिडीओमध्ये सरपंच संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण केली जात असल्याचे दिसत आहे. तसेच, एक आरोपी संतोष देशमुख यांच्या छातीवर पाय ठेवून फोटो काढण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच, संतोष देशमुखांना मारहाण करत असताना आरोपींच्या चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचा पश्चाताप दिसत नाही. तसेच, एक आरोपी यावेळी सेल्फी घेत हसताना दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लोकं यामुळे संतापले आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये 66 पुरावे तसेच, 184 जबाब महत्त्वाचे ठरले आहेत. आरोपींनी पाईपला करदोड्याने मूठ तयार करून संतोष देशमुख यांना मारहाण केली. तसेच, यामध्ये 5 गोपनीय साक्षीदारही महत्त्वाचे ठरले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर केज न्यायालयात 12 मार्चला पहिली सुनावणी होणार आहे.



Source link

Comments are closed.