संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण – आरोपी जयराम चाटे भावाच्या तेराव्यासाठी बाहेर येणार
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील एक आरोपी जयराम चाटे आपल्या धाकट्या भावाच्या निधनानंतर धार्मिक विधी म्हणजेच तेराव्यासाठी तुरूंगाबाहेर येणार आहे. या धार्मिक विधीसाठी उपस्थित राहण्याची विशेष परवानगी देण्यात आली आहे. तब्बल चौदा महिन्यानंतर जयराम चाटे हा कारागृहाबाहेर येत आहे.
संतोष देशमुख हत्याकांडातील एक आरोपी जयराम चाटे हा बीडच्या कारागृहामध्ये चौदा महिन्यापासून न्यायालयीन कोठडीत आहे. जयराम चाटे याचा छोटा भाऊ श्रीराम चाटे याचे 2 मार्च रोजी तांबवा येथे निधन झाले. हिंदू परंपरेनुसार निधनानंतर धार्मिक विधी महत्वाचा मानला जातो. कारागृहात असणार्या जयराम चाटेने आपल्या वकिलामार्फत सुनावणी करणार्या न्यायालयाकडे धार्मिक विधीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी मागितली. या अर्जावर 6 मार्च रोजी कोर्टात सुनावणी झाली. आरोपीच्या वकिलांनी केलेल्या अर्जाला सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी कडाडून विरोध केला. पण न्यायालयाने जयराम चाटे याला सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत पोलीस बंदोबस्तामध्ये धार्मिक विधीस उपस्थित राहण्याची परवानगी दिली. न्यायालयाच्या आदेशानुसार जयराम चाटेला पोलीस बंदोबस्ताचे शुल्क भरावे लागणार आहे. तसेच न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटी आणि शर्थीचेही पालन करावे लागणार आहे.
Comments are closed.