कराडला मकोका, मुंडेंचा राजीनामा, मग पोलीस अधिकाऱ्यांनाच अभय का?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याप्रकरणी कराडला मकोका लावला. मुंडेंनी राजीनामा दिला, मग पोलीस अधिकाऱ्यांनाच अभय का असा बिडकरांनी केला आहे. पहिल्या दिवसापासून संशयाच्या भोवऱ्यात असलेले पोलीस अधिकारी राजेश पाटील आणि प्रशांत महाजन यांच्यावर कोण मेहेरबान आहे? केवळ निलंबन आणि सक्तीची रजा अशी फुटकळ कारवाई करून या दोन्ही अधिकाऱ्यांना का वाचवले जात आहे, असा प्रश्न बीडकर करत आहेत.

अपहरणकर्त्यांचे लोकेशन माहिती असतानाही पोलिसांनी संतोष देशमुखांची हत्या होऊ दिली आणि आरोपींना पळून जाण्यास मदत केली. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलिसांच्या नाकर्तेपणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. आरोपी पोलिसांसमोर पळून गेले. त्यावेळीही पोलिसांनी आरोपी वाशीच्या जंगलात गेल्याचे सांगितले. वास्तविक वाशी तालुक्यात कुठेही जंगल नाही. हत्येच्या एक दिवस अगोदर आरोपी सुदर्शन घुले आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील केजमधील एका हॉटेलमध्ये कशासाठी भेटले होते. हे प्रश्न अनुत्तरित असताना या प्रकरणाची साधी चौकशीही न करता पोलिसांना वाचवण्याचे काम कोण करत आहे, असा प्रश्न आहे.

पोलीस अधिकाऱयांचे सीडीआर च्या तपासत नाही

तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना कोण मॉनिटर करत होते. हे तीन अधिकारी कोणाच्या संपका&त होते हे शोधून काढले पाहिजे. त्यासाठी या अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासावे हीच आपली मागणी असल्याचे धनंजय देशमुख म्हणाले.

Comments are closed.