Santosh deshmukh photos chargsheet killers beaten with rod and shot on mobile


मुंबई : 9 डिंसेबर 2024… मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. खंडणी प्रकरणात झालेल्या वादातून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. वाल्मिक कराडच्या टोळीतील फंटर लोकांनी अत्यंत शांत डोक्याने संतोष देशमुख यांना अमानूष मारहाण केली. यात देशमुख यांचा मृत्यू झाला. आजपर्यंत आपण फक्त संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचे ऐकत आलो आहे. पण, ‘सीआयडी’ने न्यायालयात दाखल केलेल्या चार्जशीटमधून संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचे काही फोटो समोर आले आहेत.

‘क्रूर’ हा शब्दही कमी पडेल, अशी मारहाण संतोष देशमुख यांना नासक्या प्रवृत्तीच्या आरोपींकडून करण्यात आली आहे. काळीज पिळटवून टाकणारे हे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्र एकप्रकारे हळहळला आहे. फोटो पाहून अनेकांना अश्रूंचे बांध फुटले आहेत. तर, कुणालाही हे फोटो पाहवणे सुद्धा झाले नाहीत.

( छायाचित्रे वाचकांना विचलित करू शकतात )

santosh deshmukh photos
सुदर्शन घुले संतोष देशमुखांना मारहाण करताना

एका फोटोत संतोष देशमुख हे अर्धनग्न बसले आहेत. त्यांचे डोळे सुजलेले दिसत आहेत. एक आरोपी देशमुख यांना रॉडने मारहाण करताना दिसत आहे. दुसरा एक मारहाणीचा व्हिडिओ काढतंय. निचपणाचा कळस म्हणजे एक आरोपी संतोष देशमुखांचा मारहाण करताना हसतोय. तर, दुसरा एक संतोष देशमुख यांच्या छातीवर पाय ठेवून उभा आहे. काही गोष्टी न बोललेल्या बऱ्या असत्यात. पण, एकाने संतोष देशमुख यांच्या तोंडात लघूशंका केल्याचा संतापजनक फोटोही निच लोकांनी काढला आहे.

santosh deshmukh photos (3)
संतोष देशमुख यांच्या छातीवर पाय ठेवलाय…

संतोष देशमुख यांच्या हत्येचे एकूण 15 व्हिडिओ व 8 फोटो ‘सीआयडी’च्या हाती आले आहेत. हे व्हिडिओ व फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या मनात संतापाची लाट निर्माण झाली आहे.

santosh deshmukh photos (2)
राक्षसी पद्धतीने हसणारा महेश केदार

यातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याचे त्यांनीच मान्य केले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी नैतिकतेने राजीनामा द्यावा, अशी मागणी संतोष देशमुख यांचे फोटो समोर आल्यानंतर जोर धरत आहे. धनंजय मुंडे यांच्यात नैतिकता असेल, तर ते राजीनामा देतील का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

santosh deshmukh photos (4)
रॉडने मारहाण करताना आरोपी



Source link

Comments are closed.