हातात बिअरची बाटली, गोव्याच्या रस्त्यावर फिरणारी सारा तेंडुलकर; नेमकं काय करतं होती सचिनची लेक?
सारा तेंडुलकरचा व्हायरल व्हिडिओ: सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडीओमुळे सध्या चांगलीच खळबळ उडाली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या व्हिडीओमध्ये सारा गोव्यातील रस्त्यावर हातात बिअरची बाटली घेऊन फिरताना स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडीओ तेथून जाणाऱ्या एका मोटोप्लॉगरने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
सारा तेंडुलकर रस्त्यावरून चालत असताना बिअरची बाटली हातात धरून दिसल्याने वादाला तोंड फुटले
सचिन तेंडुलकरच्या मुलीच्या व्हायरल व्हिडिओने इंटरनेटवर फूट पाडली आहे आणि काहींनी याला काही मोठे नाही असे म्हटले आहे!#सारातेंडुलकर #व्हायरलव्हिडिओ #BollywoodStarKids #CelebritySpotting #GossipGully pic.twitter.com/snFdrySSaH— Thegossipgully.com (@thegossipgully) 30 डिसेंबर 2025
सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्त झाले असले, तरी त्यांचे नाव नेहमीच चर्चेत असते. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सचिन नाहीत, पण त्यांची मुलगी सारा बिअरची बाटली हातात घेतलेली दिसत आहे. सारा कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. मिळालेल्या माहितीनुसार, ती सध्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत गोव्यात न्यू इयर सेलिब्रेशनसाठी गेली आहे. या व्हिडीओमध्ये सारा काही मित्रांसोबत दिसते. त्यामध्ये गोव्याचा आर्टिस्ट सिद्धार्थ केळकर आणि साऱ्याची होणारी वहिनी सानिया चंडोक यांचाही समावेश आहे.
सचिन तेंडुलकर : मी कधीही दारू आणि तंबाखूचा प्रचार करणार नाही.
ले त्याची मुलगी सारा गोव्याच्या रस्त्यावर 🥲:https://t.co/zkDbfPHhsT
— Ctrl C Ctrl Memes (@Ctrlmemes_) ३१ डिसेंबर २०२५
हातात बिअर, गोव्यात फिरणारी सारा तेंडुलकर
सारा तेंडुलकरने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, मात्र लोकांचे लक्ष सर्वाधिक तिच्या हातातील बिअरच्या बाटलीकडे गेले. व्हिडीओमध्ये ती बाटली हातात घेऊन चालताना दिसते. काही नेटकऱ्यांनी यावरून सारावर टीका केली, तर अनेकांनी तिचा बचाव करत “तिला तिच्या मर्जीनुसार सुट्टीचा आनंद घेण्याचा पूर्ण अधिकार आहे” असे मत व्यक्त केले.
साऱ्याची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग आहे आणि तिच्या नम्र स्वभावासाठी ती ओळखली जाते. मात्र एका ट्रोलरने असा टोमणा मारला की, “सचिन तेंडुलकर यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत कधीही सिगारेट किंवा दारूच्या ब्रँडचे प्रमोशन केले नाही, पण त्यांची मुलगी गोव्याच्या रस्त्यांवर बिअरची बाटली घेऊन फिरताना दिसते.” सारा तेंडुलकर या सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या डायरेक्टर असून पिलाटेज अँड वेलनेस स्टुडिओची फाउंडर देखील आहे. तिने लंडनमधून न्यूट्रिशनमध्ये मास्टर्स डिग्री मिळवली आहे. याशिवाय ब्रँड प्रमोशनच्या माध्यमातूनही ती चांगली कमाई करते.
हे ही वाचा –
2026 मध्ये ‘हे’ पाच दिग्गज खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती
आणखी वाचा
Comments are closed.