अर्जुन तेंडुलकर कसा आहे? साराने केवळ चार शब्दांत सांगितले, पोस्ट व्हायरल

सारा तेंडुलकरने इंस्टाग्रामवर तिचा धाकटा भाऊ अर्जुनसाठी एक भावूक पोस्ट शेयर केली आहे, जी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. अर्जुन इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) लखनऊ सुपर जायंट्सकडून (एलएसजी) खेळतो. साराने त्याची मुलाखत शेयर केली आहे. आयपीएलचा हा नवीन हंगाम त्याच्या कारकिर्दीतील महत्वाचा टप्पा आहे.

अर्जुनने पाच वर्ष मुंबई इंडियन्सच्या फ्रॅंचायजीसोबत घालवल्यानंतर एका ट्रेडमार्फत तो एलएसजीमध्ये सामील झाला. त्याला ३० लाख रुपयांमध्ये संघात घेतले गेले. दोन्ही फ्रॅंचायजीमध्ये झालेल्या ट्रेडमधील अर्जुन एक होता, शार्दुल ठाकुरने लखनऊ सोडून मुंबईमध्ये प्रवेश केला.

साराने अर्जुनचे कौतुक केले आहे. तिने शेयर केलेल्या मुलाखतीमध्ये त्याला ‘सर्वात दयाळू व्यक्ती’, असे संबोधले आहे. अर्जुनने शुभाकर मिश्राच्या पॉडकास्टवर बोलताना एमआयमधून बाहेर पडल्याबद्दल पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये त्याने त्याला बाकावर बसून राहणे आवडत नाही, असे वक्तव्य केले आहे. मुंबईकडून त्या पाच हंगामांमध्ये तो रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली केवळ पाच सामने खेळला होता.

“मला नेहमी ते जाणवतं होते. कुणालाच जाणवत नाही का? मेहनत करा आणि संधी मिळेल तेव्हा कामगिरी करा. मी माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडलो नाही, कारण येथेही मला मजा यते आहे,” असे अर्जुन म्हणाला आहे.

डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन सध्यातरी एलएसजीकडून खेळलेला नाही. तो पहिल्या दोन सामन्यांसाठी अंतिम अकरामध्येही नव्हता. त्याला संघात स्थान मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागणार आहे, कारण संघात आधीच उत्तम वेगवान गोलंदाजांचा भरणा आहे. रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील या संघात मोहम्मद शमी, दक्षिण आफ्रिकेचा एनरिक नॉर्किया, आवेश खान, मोहसीन खान, मयंक यादव, प्रिंस यादव आणि आकाश सिंग आहेत.

Comments are closed.