धनंजयला आत टाका, जेलची हवा खाऊ द्या, शेवटी मुंडे बहीण भावाला 6 फुटाच्या पांढऱ्या चादरीत जायचंय

सारंगली महाजन, बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडला अटक करण्यात आलीये. अटक झाल्यानंतर वाल्मिक कराडवर मकोकाही लावण्यात आलाय. त्यामुळे ‘ते माझ्या जवळचे आहेत’ हे उघडपणे सांगणाऱ्या धनंजय मुंडेंच्या राजकीय अडचणी वाढल्या आहेत. बीडच्या पालकमंत्रिपदापासून देखील धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) मुकावं लागलं आहे. दुसरीकडे बीडमधील अनेक राजकारणी उघडपणे धनंजय मुंडेंच्या विरोधात एकवटले असताना सारंगी महाजन (Sarangli Mahajan) यांनी मंत्री पंकजा मुंडे (Pankja Munde)आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. सारंगी महाजन (Sarangli Mahajan) यांनी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर मुंडे बंधू-भगिणीवर जोरदार हल्लाबोल केलाय.

सारंगी महाजन काय काय म्हणाल्या?

सारंगी महाजन म्हणाल्या, मला तर म्हणायचं आहे की, तुम्ही धनंजयला देखील आतमध्ये टाका. थोडे दिवस त्याला हवा खाऊद्या. सरकारी जेवण जेऊ द्या. बरं वाटेल. मुंडे बहीण भाऊ माणुसकीला काळिमा फासणारे लोक आहेत. त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलं पाहिजे. त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं पाहिजे. करोडो रुपये घेऊन कुठे जाणार आहेत हे? यांना फक्त सहा फुटाच्या पांढऱ्या चादरीवर जायचंय. सगळं इथे ठेवायचंय.

पुढे बोलताना सारंगी महाजन म्हणाल्या, मुंडे साहेबांनी इतके वर्ष कमावलेली इज्जत त्यांनी घालवलेली आहे. याच्यामध्ये मुंडे साहेबांची मुलगी पुतण्या दोघेही जबाबदार आहेत.

सारंगी महाजन यांनी यापूर्वी कोणते आरोप केले ?

धनंजय मुंडे यांनी माझी जिरेवाडीतील तीन कोटींची जमीन हडपली आहे. त्यात पंकजा मुंडे यांचाही हात आहे. धनंजय मुंडे यांच्या नोकऱ्याच्या नावावर ही जमीन करण्यात आली. मला धमक्या देऊन कोऱ्या बाँडवर सह्या घेतल्या. सह्या केल्या नाहीत तर परळीतून बाहेर जाऊ देणार नाहीत, असा दम भरला. साडेतीन करोड रुपयांची जमीन फक्त 21 लाखात घेतली तीन दिवसांत सातबारा ही त्यांनी बदलला . गोविंद मुंडे, त्याची सुन आणि दशरथ साठे यांच्या नावावर केली आहे. यानंतर धनंजय मुंडे यांना मी भेटले त्यानंतर ते टाळाटाळ करायला लागले  आणि म्हटले की मामी तुझा फोलोअप कमी पडला. मी धनंजय मुंडे यांना हॉस्पिटलमध्ये भेटायला गेले त्यावेळी तो म्हणाला की मामी काळजी करु नको परळीत कुठलंही जमीन विकली तर ती मला कळते. नंतर कळल की मी चोराकडेच आलेय.साडेतीन करोड रुपयांची जमीन फक्त 21 लाखात घेतली तीन दिवसांत सातबारा ही त्यांनी बदलला . गोविंद मुंडे, त्याची सुन आणि दशरथ साठे यांच्या नावावर केली आहे. यानंतर धनंजय मुंडे यांना मी भेटले त्यानंतर ते टाळाटाळ करायला लागले  आणि म्हटले की मामी तुझा फोलोअप कमी पडला. मी धनंजय मुंडे यांना हॉस्पिटलमध्ये भेटायला गेले त्यावेळी तो म्हणाला की मामी काळजी करु नको परळीत कुठलंही जमीन विकली तर ती मला कळते. नंतर कळल की मी चोराकडेच आलेय.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Anandraj Ambedkar : मुख्यमंत्र्यांना सत्तेचा माज, बीड आणि परभणी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा : आनंदराज आंबेडकर

अधिक पाहा..

Comments are closed.