विद्यार्थ्यांनी लुटला नव्वदच्या दशकातील खेळाचा आनंद

माहीम येथील सरस्वती मंदिर शाळेने आपल्या प्रांगणात सुरू केलेल्या उन्हाळी शिबिराला बच्चे कंपनीचा उदंड प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी नव्वदच्या दशकातील विविध खेळाचा आनंद लुटला. सरस्वती विद्या मंदिरतर्फे गेली 35 वर्षे उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य क्रीडा शिबीर आयोजित केले जाते. आतापर्यंत शाळा आणि परिसरातील अनेक विद्यार्थ्यांनी या क्रीडा शिबिराचा आनंद घेतला आहे. या वर्षीच्या क्रीडा शिबिराचे वैशिष्टय़ म्हणजे नव्वदच्या दशकातील आटय़ापाटय़ा, विटी-दांडू, लगोरी, रस्सीखेच अशा खेळांचा आनंद विद्यार्थ्यांना लुटता आला. शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच जुन्या खेळांना पुनरुज्जीवन देण्यासाठी यंदाच्या शिबिराने मोलाची भूमिका बजावली. विद्यार्थ्यांनीही मोठय़ा संख्येने या शिबिराला प्रतिसाद दिला.
Comments are closed.