ज्याने भारताला हरवून पाकिस्तानला ICC चॅम्पियन बनवलं; त्याच सरफराज अहमदने घेतली निवृत्ती

सरफराज अहमद आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त पाकिस्तान क्रिकेट संघाचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज आणि माजी कर्णधार सरफराज अहमद याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. जवळपास दोन दशकं पाकिस्तान क्रिकेटची सेवा करणाऱ्या सरफराजच्या या निर्णयासह सर्वांना धक्का बसला. कराची येथे जन्मलेल्या सरफराज अहमदने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. त्याने 54 कसोटी, 117 एकदिवसीय (ODI) आणि 61 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या काळात त्याच्या बॅटमधून एकूण 6164 धावा आल्या, ज्यामध्ये 6 शतके आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. यष्टीमागेही तयांची कामगिरी प्रभावी राहिली. त्याने 315 झेल टिपले, तर 56 फलंदाजांना स्टंपआउट केले.

पाकिस्तानचा ‘चॅम्पियन कर्णधार’ सरफराज अहमद निवृत्त

कर्णधार म्हणूनही सरफराज याने पाकिस्तानसाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 100 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळला. तर त्याच्या कर्णधारपदाच्या काळात पाकिस्तान टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत नंबर-1 वर पोहोचला. सरफराजच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने टी-20मध्ये सलग 11 मालिका जिंकण्याचा जागतिक विक्रम केला, तसेच 6 वेळा प्रतिस्पर्धी संघांना क्लीन स्वीप दिला.

2017 चॅम्पियन्स ट्रॉफीची ऐतिहासिक कामगिरी

सरफराज अहमदच्या कर्णधारपदाखाली पाकिस्तानने 2017 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत इतिहास रचला. इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा 180 धावांनी पराभव करत किताब पटकावला. या विजयानंतर सरफराज पाकिस्तानचे पहिला कर्णधार ठरला ज्याने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा मान मिळवला.

याशिवाय तो पाकिस्तानचा असा एकमेव कर्णधार आहेत ज्याने ज्युनियर आणि सीनियर दोन्ही स्तरांवर आयसीसी स्पर्धा जिंकल्या. 2006 मध्ये त्याने पाकिस्तानला अंडर-19 वर्ल्ड कप जिंकून दिला होता. त्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा 38 धावांनी पराभव केला होता.

अनेक खेळाडूंना दिली संधी

सरफराजच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिकेटला अनेक भविष्यातील स्टार खेळाडू मिळाले. बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी, हसन अली, इमाम-उल-हक, फखर झमान, शादाब खान आणि फहीम अशरफ यांसारख्या खेळाडूंना त्यांनी संधी दिली.

कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 10 झेल घेण्याचा पाकिस्तानचा विक्रमही सरफराजच्या नावावर आहे. 2019 मध्ये जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने ही कामगिरी केली होती. तसेच लॉर्ड्स मैदानावर एकदिवसीय शतक झळकावणारा तो पाकिस्तानचा एकमेव यष्टीरक्षक-फलंदाज आहेत. 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने ही कामगिरी केली होती.

सरफराज अहमदने 2007 मध्ये एकदिवसीय सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तर 2023 मध्ये पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेला कसोटी सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला.

निवृत्ती जाहीर करताना व्यक्त केली कृतज्ञता

निवृत्ती जाहीर करताना सरफराज अहमद याने सांगितले की, पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणे हा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान होता. 2006 चा अंडर-19 वर्ल्ड कप जिंकण्यापासून ते 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी उचलण्यापर्यंतचा प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी खास राहिला. त्याने सहकारी खेळाडू, प्रशिक्षक, कुटुंबीय आणि चाहत्यांचे पाठबळ मिळाल्याबद्दल आभार मानले.

हे ही वाचा –

PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली

आणखी वाचा

Comments are closed.