सरफराज खानचा चित्तथरारक झेल, अक्षर पटेलसोबत सगळेच अवाक्, सेलिब्रेशनने चेपॉकला वेड लावलं, नेमकं
CSK विरुद्ध DC IPL 2026 : आयपीएल 2026 मधील 18वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात चेन्नईचा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनने अक्षरशः धुमाकूळ घालत शानदार शतक झळकावले. त्याच्या या तुफानी खेळीच्या जोरावर चेन्नईने 20 षटकांत 2 गडी गमावून 212 धावांचा डोंगर उभा केला. दरम्यान, सामन्यात एका थरारक कॅचने सर्वांच्या भुवया उंचावल्या. दिल्लीचा अनुभवी फलंदाज अक्षर पटेल याला तंबूत धाडण्यासाठी सरफराज खानने बॅकवर्ड पॉईंटला चित्तथरारक झेल घेतला आणि त्यानंतर केलेले सेलिब्रेशन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
लूपवर पाहण्यास पात्र! ➰
🎥 सरफराज खान 𝗦𝗧𝗨𝗡𝗡𝗘𝗥 सोबत 🫴
अपडेट्स ▶️ https://t.co/BzGc6O65jX #TATAIPL | #खेळबिंदास | #CSKvDC | @ChennaiIPL pic.twitter.com/ve2q6V6a5z
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) 11 एप्रिल 2026
गुरजपनीत सिंगचे स्वप्नवत पदार्पण (Gurjapneet Singh 1st IPL wicket)
चेन्नईचा डावखुरा वेगवान गोलंदाज गुरजपनीत सिंगसाठी हा सामना विसरता येणार नाही. आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिलाच चेंडू टाकण्यासाठी तो सज्ज झाला होता. समोर अक्षर पटेल होता. गुरजपनीतने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर अक्षरने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण तिथेच सरफराज खान आडवा आला.
सरफराज खानचा शानदार झेल
चेंडू बॅटला लागून वेगाने बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने गेला. तिथे उभ्या असलेल्या सरफराज खानने चित्त्याच्या चपळाईने झेप घेतली आणि अशक्य वाटणारा झेल टिपला. मैदानातील प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला, तर अक्षर पटेललाही आपण बाद झालो आहोत यावर क्षणभर विश्वास बसला नाही. अक्षर पटेल फक्त 1 धाव काढून बाद झाल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सची मधली फळी अडचणीत आली आहे.
सेलिब्रेशनने वेधलं लक्ष
झेल घेतल्यावर सरफराजचा आनंद गगनात मावेनासा झाला. झेल टिपल्याबरोबर सरफराजने संपूर्ण मैदानात सुसाट पळायला सुरुवात केली. आपल्या सहकाऱ्यांना न भेटता तो आनंदाने मैदानावर फेरफटका मारत होता. त्याचे हे क्रेझी सेलिब्रेशन पाहून चेपॉकचे स्टेडियम प्रेक्षकांच्या आवाजाने दणाणून गेले.
*उत्कृष्ट झेलांपैकी एक!* 🔥
अचानक, दिल्ली कॅपिटल्स 4️⃣ खाली! 😱
सरफराज खानच्या एका अप्रतिम डायव्हिंगने चेपॉकमध्ये उकाडा वाढवला आणि आणखी दोन फटके मारून CSK गर्दीला वेड लावले! 💛👏 pic.twitter.com/2UFhna6Oer
— Content Soul✌️🎯🩵 (@rajeshkodavati) 11 एप्रिल 2026
हे ही वाचा –
Sanju Samson Century : अपमानाचा बदला शतकाने! सलग 3 फ्लॉप शोनंतर संजूचा ‘विराट’ अवतार; यलो जर्सीत ठोकलं पहिलं तुफानी शतक, मोडले सगळे विक्रम
आणखी वाचा
Comments are closed.