19 चौकार, 9 षटकार… रणजी ट्रॉफीत मुंबईच्या सरफराज खानचा रौद्र अवतार, निवडकर्त्यांना थेट संदेश

सरफराज खान द्विशतक: टीम इंडियाचा फलंदाज सरफराज खान सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विजय हजारे ट्रॉफीनंतर आता रणजी ट्रॉफीतही त्याची बॅट चालतेय. हैदराबादकडून खेळताना सरफराज खाने द्विशतक झळकावत पुन्हा एकदा निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले.

रणजीत सरफराजचा धमाका, ठोकलं द्विशतक

हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात सरफराज खानने अवघ्या 206 चेंडूमध्ये द्विशतक पूर्ण केले. अखेर तो 219 चेंडूमध्ये 9 षटकार आणि 19 चौकारांसह 227 धावा करून बाद झाला. या सामन्यात त्याच्याकडे त्रिशतक करण्याची संधी होती, मात्र तो टप्पा गाठता आला नाही. तरीही ही खेळी त्याच्या टीम इंडियातील पुनरागमनाची जोरदार दावेदारी ठरतेय.

फर्स्ट क्लास कारकिर्दीत नवा टप्पा

ही सरफराजच्या फर्स्ट क्लास कारकिर्दीतील 17वी शतकी आणि सहावी द्विशतकी खेळी ठरली. विशेष म्हणजे, त्याने 50 दिवसांच्या आत देशांतर्गत क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. 2 डिसेंबर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत असमविरुद्ध 47 चेंडूमध्ये झंझावाती शतक होते. तर 31 डिसेंबर रोजी विजय हजारे ट्रॉफीत गोवाविरुद्ध 75 चेंडूमध्ये 157 धावा केल्या होत्या.

आता रणजी ट्रॉफीत दमदार द्विशतक

या खेळीदरम्यान सरफराजने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पाही पार केला. आतापर्यंत 61 सामने, 91 डावांत त्याने 5090 धावा, सुमारे 64.3 च्या सरासरीने आणि 70.10 स्ट्राइक रेटने केल्या आहेत.

टीम इंडियात संधी मिळणार का?

सरफराज खानने 2024 साली इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने शेवटचा कसोटी सामना त्याच वर्षी न्यूझीलंडविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळला होता. त्यानंतर तो गेल्या एक वर्षाहून अधिक काळ टीम इंडियाबाहेर आहे. ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीदरम्यान तो संघात होता, मात्र खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आतापर्यंत 6 कसोटी सामन्यात त्याने 371 धावा केल्या आहेत.

हे ही वाचा –

COMPETITIVE Bid For RCB: किंग कोहलीच्या आरसीबीला खरेदी करण्यासाठी पहिला ग्रुप समोर आला! किती हजार कोटीत सौदा होणार?

आणखी वाचा

Comments are closed.