IPL 2026 – लिलावापूर्वी सरफराज खानने दावेदारी केली सिद्ध; गोलंदाजांना काढलं चोपून, मोठी बोली लागणार?

सरफराज खानने IPL 2026 च्या लिलावापूर्वी धुरळा उडवून दिला आहे. आपल्या धारधार फलंदाजीची झलक त्याने Syed Mushtaq Ali Trophy मध्ये दाखवून दिली आहे. हरयाणाविरुद्ध त्याने 25 चेंडूंमध्ये 65 धावांची धुवांधार फटकेबाजी केली आहे. त्यामुळे IPL च्या लिलावामध्ये सरफराज खानवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सुपर लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबईकर सरफराज हैदराबादविरुद्ध अवघ्या 5 धावांवर बाद झाला होता. मात्र, हरयाणाविरुद्ध त्याने पहिल्या सामन्याची कसर भरून काढत गोलंदाजांची धुलाई केली. त्याने 18 चेंडूंमध्येच आपलं अर्धशतक पूर्ण केल आणि 25 चेंडूंमध्ये 64 धावांची खेळी केली. 256 च्या स्ट्राईक रेटने त्याने 9 चौकार आणि 3 षटकारांची आतषबाजी केली. सरफराज खानच्या पॉवरफुल खेळीमुळे मुंबईने हैदराबादचा पराभव केला.
मुंबईविरुद्ध हैदराबाद सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने मुंबईला 234 धावांचे तगडे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने दमदार सुरुवात केली. सरफराज खान आणि यशस्वीने 37 चेंडूंमध्ये 88 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. जयस्वालने शतक ठोकलं तर सरफराज खानने 64 धावा चोपून काढल्या. त्यामुळे मुंबईने 15 चेंडू बाकी ठेवत सामना जिंकला.

Comments are closed.