कधी पैसे उधळले, कधी गाडी जाळली; सरपंच साबळेंचं पुन्हा हटके आंदोलन, साडी घालून जिल्हा परिषदेत पो

सरपंच मंगेश सेबल, छत्रपती संभाजीनगर : गेवराईच्या पायगा येथील सरपंच मंगेश साबळे त्यांच्या अनोख्या आंदोलनामुळे चर्चेत असतात. यापूर्वी त्यांनी पैसे उधळून तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी स्वत:चा गाडी जाळून आंदोलन केलं होतं. आता त्यांनी गावातील पाणी प्रश्नावरुन देखील आक्रमक आंदोलन केले आहे. गावाला पाणी मिळत नसल्याने गावचा सरपंच साडी घालून जिल्हा परिषदेत दाखल झाले आहेत.

गावाला पाणी द्यावे यासाठी थेट महिलांचे रूप धारण करून सरपंच जिल्हा परिषदेच्या कार्यालयात

सरपंच मंगेश साबळे याने साडी घालून जिल्हा परिषदेचे कार्यालय गाठलं आहे. आम्हाला पाणी द्यावे अशी महिलांची मागणी आहे. मात्र महिलांच्या जागी सरपंच साडी घालून जिल्हा परिषदेत दाखल झाले आहेत. गावाला पाणी द्यावे यासाठी थेट महिलांचे रूप धारण करून सरपंच मंगेळ साबळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साबळेंनी जाळली होती स्वत:ची गाडी

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर तापला होता. दरम्यान, मराठा आरक्षण मिळावे यासाठी मंगेश साबळेंनी देखील आंदोलन केलं होतं. त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणी करत थेट स्वत:ची गाडी जाळली होती. त्यापूर्वी एका सरकारी कार्यालया समोर पैसे देखील उधळले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

लोकसभेची निवडणूक देखली लढवली

मंगेश साबळे यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक देखील लढवली होती. जालना लोकसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. या निवडणुकीत साबळेंचा पराभव झाला असला तरी त्यांनी 1 लाख 55 हजार मत मिळवली होती. मंगेश साबळेंनी घेतलेल्या मतांचा फटका भाजप नेते रावसाहेब दानवे यांना बसला होता. केंद्रीय मंत्री असतानाही रावसाहेब दानवेंना पराभवाला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, आता मंगेश साबळे पाण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे चर्चेत आले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=i9eiicpjjls

इतर महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!

VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले, “हे तर इम्रान हाश्मी”!

अधिक पाहा..

Comments are closed.