राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचे?
सातारा : राज्यात भाजप शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) घवघवीत यश मिळालं असून भाजपने 129 नगराध्यक्षांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान मिळवला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे 2 ते 5 हजार मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. मात्र, भाजपच्या (BJP) एका उमेदवाराने तब्बल 42 हजारांहून अधिक मताधिक्य घेतलं आहे. कागलमधील सविता माने ह्या राज्यातील सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी झालेल्या उमेदवार असल्याचा दावा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. मात्र, साताऱ्यात (Satara) दोन्ही राजेंची ताकद मिळाल्याने सातारा नगरपालिकेतील भाजप उमेदवार अमोल मोहिते हे राज्यात सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत.
कोल्हापुरातील कागलमध्ये हसन मुश्रीफ अन् समरजीत घाटगे यांच्या शाहू विकास आघाडीच्या सविता माने यांना 14,789 मतं मिळाली आहेत. तर, त्यांच्याविरोधातील शिवसेना उमेदवार युगेंधरा घाटगे यांना 7,199 मतं मिळाली आहेत. सविता माने यांना 7590 मताधिक्य मिळाल्याने त्या कदाचित दुसऱ्या सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी झालेल्या उमेदवार आहेत. मात्र, भाजप उमेदवार अमोल मोहिते यांनी 42,032 मतांनी आघाडी घेत विजय मिळवला आहे.
नगराध्यक्षपदाचा नवा रेकॉर्ड
भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांनी 42 हजार 32 मतांनी महाविकास आघाडीच्या सुवर्णा पाटील यांचा केला पराभव. त्यामुळे, सातारा भाजपचाच बालेकिल्ला असून खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजे यांचा करिष्मा दिसून आला. सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचे अमोल उदयसिंह मोहिते यांना 57 हजार 587 एवढे मतदान झालं आहे. त्यांच्या विरोधात असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुवर्ण पाटील यांना 15 हजार 555 मतदान पडले. भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांनी यापूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक करत 42 हजार 32 मतांनी विजयी मिळवला आहे. तर येथील निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांना विधानसभेपेक्षा जास्त मतं मिळाले आहेत. मात्र, त्यांचे डिपॉझिट जप्त झालं आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपचेच विजयी झाले आहेत.
फलटणमध्येही भाजपचे कमळ खुलले
साताऱ्याच्या फलटण तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील विरोध सर्वश्रूत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत हे दोन्ही नेते एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह हे भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले होते. तर त्यांच्या विरोधात माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे शिंदेसेनेकडून नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उभे होते. मात्र, फलटण नगरपरिषदेमध्ये कमळ फुलले आहे. फलटणमध्ये रामराजेंच्या सत्तेला धक्का बसला असून रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला आहे. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर विजयी झाले आहे.
वाईमध्ये सातारा
वाई नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार अनिल सावंत विजयी झाले आहेत. रहिमतपूर नगरपालिका नगराध्यक्ष भाजप वैशाली निलेश माने विजयी झाल्या आहेत. सातारा मलकापूर नगरपालिकामधील भाजप नगराध्यक्ष उमेदवार तेजस सोनवले विजयी झाले आहेत. मेढा नगरपंचायत भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रूपाली वरखडे विजयी झाल्या आहेत.
पाचगणी, सातारा
पाचगणी नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी (अजित पवार पुरस्कृत ) उमेदवार दिलिप बगाडे दोन मतानी विजयी झाले आहेत.
फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकृत निकाल राखून ठेवला आहे. महाबळेश्वर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष सुनील शिंदे मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. महाबळेश्वर नगरपालिकेचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील शिंदे 1451 मतांनी विजयी झाले आहेत.
मेढा नगरपंचायत भाजप उमेदवार विजयी
रहिमतपूर नगरपरिषद भाजप उमेदवार विजयी
म्हसवड नगरपरिषद भाजप विजयी
वाई नगरपरिषद भाजप विजयी
मलकापूर नगरपरिषद भाजप विजयी..
आणखी वाचा
Comments are closed.