रक्तानं माखलेली तलवार घेऊन आरोपी पोलिस स्थानकात, पोलिसही आवाक, धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं
शार्वल गुन्हेगारीची बातमी सेट अप करणे: सातारा (Satara) जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यामधील शिरवळमध्ये (Shirwal) धक्कादायक घटना घडली आहे. पूर्व वैमनस्याच्या रागातून एका 19 वर्षीय मुलानं तलवारीनं वार करत 22 वर्षीय तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडलीय. तेजस महेंद्र निगडे (वय 19) याने असं या आरोपीचं नाव आहे. तर अमर उर्फ चंदू शांताराम कोंढाळकर (वय 22) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, हत्या केल्यानंतर आरोपी तेजस हा माखलेल्या तलवारीसह पोलिस स्टेशनमध्ये आला होता.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, शिरवळ येथे बुधवारी मध्यरात्री जुन्या वादातून तरुणाचा तलवारीने सपासप वार करून खून केला. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तरुणाचा खून केल्यानंतर संशयित आरोपी रक्ताने माखलेली तलवारी घेऊन पोलीस ठाण्यात हजर झाला. दरम्यान, हत्या करण्यामागचं कारण नेमकं काय? याचा तपास पोलिस अधिकारी करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळं पोलिस देखील काही वेळ अवाक झाले होते.
रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली घटना
मिळालेल्या माहितीनुसार, शिरवळ गावच्या हद्दीत जुन्या औद्योगिक वसाहतीमधील रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका कंपनीलगत असणाऱ्या चौकात ही घटना घडली आहे. आरोपीने चंदू शांताराम कोंढाळकर या तरुणावर तलवारीने सपासप वार करीत खून केला. पूर्वीच्या भांडणातून ही घटना घडली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरवळ पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यासह भोर तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस, शिरवळ पोलीस निरीक्षक संदीप जगताप घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या ही हत्या नेमकी का करण्यात आली? या हत्येमागे आणखी काही माहिती समोर येतेय का? याबाबतचा तपास पोलिस प्रशासन करत आहे.
अलिकडच्या काळात राज्यातील काही भागात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नाशिकमध्ये देखील असे गुन्हेगारीचे प्रकार वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन देखील सतर्क झालं आहे. अशा घटनांमधील आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Nashik Crime : नाशिकमध्ये ‘त्या’ मद्यधुंद तरुण-तरुणींना धिंगाणा घालणं भोवलं! अखेर गुन्हा दाखल, पोलीस निरीक्षकाचीही तडकाफडकी बदली, नेमकं काय घडलं?
अधिक पाहा..
Comments are closed.