धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत असणार्‍या पोलीस चालकाने घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीला चिरडलं

सातारा क्राइम न्यूज: साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात असणाऱ्या सर्कलवाडी येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.  यात आज (25 एप्रिल) पहाटेच्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या पोलिसाच्या कारने रस्ता लगत एका घराच्या समोर झोपलेल्या व्यक्तीला उडवले (Crime News) आहे. यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. रमेश लक्ष्मण सपकाळ असे या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेतील संबंधित पोलीस हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. सर्कलवाडीचे ग्रामस्थ सध्या वाठार स्टेशन येथील पोलीस ठाण्यात दाखल झाले असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

बार्शी ड्रग्स प्रकरणात आणखी तिघांचा समावेश, आरोपींची संख्या पोहोचली 12 वर

बार्शीतल्या ड्रग्स प्रकरणाची व्याप्ती वाढताना पाहायला मिळतेय. या प्रकरणी आधीच 9 आरोपीचें नावे निष्पन्न असताना पोलिसांनी आणखी तिघांना आरोपी केलंय. यामध्ये परांडा येथील मस्तान शेखसह साजिद मुजावर आणि शेळके नावाच्या व्यक्तीला आरोपी म्हणून सहभागी करण्यात आलंय. मात्र हे तिघे आरोपी अद्याप फरार आहेत. 18 एप्रिल रोजी बार्शीत 20 ग्राम एमडी ड्रग्ससह पोलीसांनी तिघांना अटक केली होती. त्यानंतर या संपूर्ण ड्रग्स रॅकेटचा भांडफोड पोलिसांनी केलाय.

आतापर्यंतची करवाई पाहता बार्शी ड्रग्ज तस्करीत एकूण 12 आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यातील 9 आरोपी हे धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा येथील तर तिघे बार्शी येथील आहेत. या 12 आरोपी पैकी 7 जण पोलिस कोठडीत असून तिघे फरार आहेत. परंडा येथील दीपक काळे आणि खांडवी येथील अय्याज शौकत शेख या 2 जणांना पोलिसांनी कालच अटक केली असून त्यांना आज 25 एप्रिल रोजी कोर्टात हजर केले जाऊ शकते.

हे आहेत बार्शी ड्रग्स प्रकरणातील आरोपी

परंडा येथील असद हसन देहलुज, मेहफुज महंमद शेख, वसिम इसाक बेग, जावेद नवाबमुद्दीन मुजावर,हसन चाऊस, दीपक काळे, साजिद चाँद मुजावर, फिरोज उर्फ मस्तान रसूल शेख आणि शेळके नावाच्या अश्या 9 जणांना आरोपी केली आहे. त्यातील मुजावर, शेख व शेळके हे फरार आहेत. बार्शी येथील अय्याज शौकत शेख, जमीर अन्सार पटेल आणि सरफराज उर्फ गोल्डी अस्लम शेख हे 3 आरोपी बार्शी येथील आहेत. 20 ग्रॅम वजनाचे 10 पुड्यासह पोलिसांनी 18 एप्रिल रोजी 3 जणांना अटक केली होती त्यानंतर तस्करीचा भांडाफोड झाला.

https://www.youtube.com/watch?v=KCJ7LDETCVK

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Comments are closed.