मृत डॉक्टर तरुणीने ज्यांच्याकडे तक्रार केली होती ते डॉ. धुमाळ काय म्हणाले? खासदारांचं नाव काढता


फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येची बातमी फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे साताऱ्यासह राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या डॉक्टर तरुणीने भाऊबीजेच्या दिवशी फलटणमधील एका नामांकित हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या (Satara Doctor Suicide) केली होती. तिने आपल्या हातावर लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये PSI गोपाळ बदने, प्रशांत बनकर, खासदार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याबाबत आपण रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. अंशुमन धुमाळ यांच्याकडे लेखी तक्रार केल्याचेही तरुणीने सुसाईड नोटमध्ये (Suicide note) म्हटले होते. मात्र, ‘एबीपी माझा’ने डॉ. अंशुमन धुमाळ यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले. (Satara Crime news)

मृत डॉक्टर तरुणीने पोलीस कर्मचारी तिला त्रास देत असल्याचे जे आरोप केले आहेत, तसा कुठलाही उल्लेख आमच्या कार्यालयाकडे नाही. त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या चौकशी समितीसमोर तसा खुलासा केलेला आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनलाही त्यांनी तशी माहिती दिली होती. त्यावेळी त्यांनी चौकशी समितीसमोर तसा खुलाला दिला होता. मात्र, मृत डॉक्टर तरुणीने आपण PSI गोपाल बदने याच्याकडून सुरु असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाबाबत डॉ. धुमाळ यांना वेळोवेळी कळवल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले होते. यावर बोलताना डॉ. अंशुमन धुमाळ यांनी पूर्णपणे हात वर केले. त्यांनी म्हटले की, डॉक्टर तरुणीने माझा छळ होतोय, असे कुठेही लेखी स्वरुपात कळवले नव्हते. त्यांनी केवळ चौकशी समितीसमोर पोलिसांबाबत काही मुद्दे मांडले. चौकशी समितीचा अहवाला आला त्यानुसार सूचना देण्यात आल्या होत्या. हे प्रकरण तिथेच संपले, असेही डॉ. धुमाळ यांनी म्हटले.

Satara Crime news: डॉ. धुमाळ म्हणतात, मी पीएसआय गोपाल बदनेला कधी बघितलेच नाही

या प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाळ बदने याच्याबाबत विचारल्यावर डॉ. अंशुमन धुमाळ यांनी कानावर हात ठेवले. त्यांनी म्हटले की, पीएसआय गोपाळ बदने याचं नाव मी प्रथमच ऐकत आहे. मला किंवा कर्मचाऱ्यांनी चौकशी समितीसमोर जो जबाब दिला आहे, त्यामध्ये असा कोणताही प्रकार जाणवल्याचे म्हटलेले नाही. आमचे सुरक्षा रक्षक, कर्मचारी किंवा रुग्णालयातील नर्स यापैकी कोणीही असा प्रकार घडल्याचे सांगितले नाही, असे डॉ. धुमाळ यांनी म्हटले. यावेळी डॉ. धुमाळ यांना खासदारांचे दोन पीए रुग्णालयात येऊन त्यांनी मृत डॉक्टर तरुणीशी खासदारांचे बोलण करुन दिले, याबाबत विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी म्हटले की, मला मृत डॉक्टर तरुणीने खासदारांबाबत कधीही काही सांगितले नाही. त्यामुळे मी यावर काहीच भाष्य करु इच्छित नाही, असेही डॉ. अंशुमन धुमाळ यांनी सांगितले.

आणखी वाचा

फलटणमध्ये डॉक्टर तरुणीने आयुष्य संपवलं, रणजितसिंह निंबाळकर म्हणतात, ‘आम्ही विरोधकांना भीक घालत नाही’

आणखी वाचा

Comments are closed.