एसआयटी चौकशी करा, राष्ट्रवादीचा मंत्रालयावर मोर्चा

फलटण येथील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचे पडसाद आज मंत्रालयाबाहेरही उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मंत्रालयावर मोर्चा काढला. संपदा मुंडे प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली. मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी शेख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
डॉ. संपदा मुंडे प्रकरण असो किंवा पुण्याचे आगवणे प्रकरण, ही आत्महत्या नाही, हत्या आहे. तरीही सरकार शांत आहे. फलटण पोलीस स्वतः आरोपींचे संरक्षण करत आहेत. जे छळाचे आरोपी आहेत, त्यांच्याच हाती चौकशी देणे म्हणजे न्यायप्रक्रियेचा उपहास आहे. त्यामुळे या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी मेहबूब शेख यांनी केली.
 
			 
											
Comments are closed.