हातावर पेनानं लिहिलं, महिला डॉक्टरने जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये पोलिसावर अत्याचाराचा आरोप, सा


Satara Doctor Crime News: सातारामधील फलटण (Satara Crime News) येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फलटण उपजिल्हा रूग्णालयातील (Phaltan Sub District Hospital) महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. डॉक्टरच्या हातावर पेनाने सुसाईड नोट लिहिली आहे. या सुसाईड नोटमध्ये पोलीस निरीक्षक गोपाल बदनेनं वारंवार अत्याचार केल्याचं नमूद करण्यात आलं आहे. सदर घटनेनं साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय? (Satara Doctor Crime News)

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रूग्णालयात महिला डॉक्टरने आत्महत्या केलीय. मात्र आता या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलंय. मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळली आहे. या सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरने आपल्यावर बलात्कार झाल्याचं लिहिलंय. त्यात त्यांनी पोलीस निरीक्षक गोपाल बदनेचं नाव लिहीलंय. पोलीस निरीक्षक बदनेनं चारवेळा बलात्कार केल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. तसंच पोलीस प्रशांत बनकर यानेही मानसिक त्रास दिल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटलंय. काही महिन्यांपासून त्या पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या अशी माहिती समोर येतेय. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी वादानंतर त्यांची चौकशी सुरू होती असं समजतंय. मात्र डॉक्टरच्या मृतदेहाच्या हातावर थेट सुसाईड नोट आढळलीय. त्यात त्यांनी पोलिसानेच बलात्कार झाल्याचं नमूद करत आत्महत्या केल्याचं म्हटलंय.

सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलंय? (Phaltan Satara News)

पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर याने मला सतत मानसिक त्रास दिला.

काही महिन्यांपासून चालू होता वाद- (Phaltan Sub District Hospital)

दरम्यान, संबंधित डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी त्यांचा वाद झाल्यानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान त्यांनी आपल्या वरिष्ठांना लेखी स्वरूपात तक्रार देत म्हटले होते की, माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन. तथापि, त्यांच्या या तक्रारीकडे वरिष्ठांकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नाही, असा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांकडून केला जात आहे.

संबंधित बातमी:

Satara Crime: महिला डॉक्टरनं आयुष्य संपवलं, हातावर सुसाईड नोट; म्हणाली, माझ्यावर PI बदनेने चारवेळा अत्याचार केला, साताऱ्यात खळबळ!

Pune Crime News : पत्नीच्या चारित्र्यावर संशय; नगरसेवक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पत्नीनं पतीचा ओढणीनं गळा घोटला, मध्यरात्री पुण्यात नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.