या घटनेने फलटणची बदनामी झाली, CDR काढले तर या प्रकरणाचा छडा लागेल : रामराजे नाईक निंबाळकर


साताऱ्यातील डॉक्टरची आत्महत्या : सातारा जिल्ह्यातील फलटण (Phaltan) उपजिल्हा रूग्णालयात एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली. मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळली आहे. या सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरने आपल्यावर बलात्कार झाल्याचं लिहिलंय. त्यात तिने पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेचं नाव लिहिलंय. या प्रकरणावर विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेने फलटणची बदनामी झाली आहे. का झाली आहे हे सर्वांना माहीत आहे. CDR काढले तर या प्रकरणाचा छडा लागेल. मुख्यमंत्र्यांच्या तपासाबाबत माझा विश्वास असल्याचे मत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे.

मी या घडलेल्या घटनेबाबत तीव्र निषेध व्यक्त करतो असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे. पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटता आले असते तर बरे झाले असते, असेही ते म्हणाले. मला कोणावरही आरोप करायचे नाहीत. या आधी फलटण तालुक्यात सरकारी लोक आवर्जून बदली मागायचे असेही रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले.

फरार असलेल्या आरोपींचा शोध युद्ध पातळीवर सुरु : अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर

पोलीस अधिकारी पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे या प्रकारचा गुन्हा फलटण पोलिसांकडून दाखल करण्यात आला असल्याची  माहिती अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी दिली आहे. फरार असलेल्या आरोपींचा शोध युद्ध पातळीवर सुरु आहे. मृत डॉक्टर महिलेचे शेवटचं बोलणं हे आरोपी प्रशांत बनकर यांच्याशी झालं होतं. त्यांचा डॉक्टरची खूप वेळाचे फोन झाले आहेत. याचा तपास पोलीस प्रशासन करत आहे असे अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर म्हणाल्या.

नेमकं प्रकरण काय?

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रूग्णालयात एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली. मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळली आहे. या सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरने आपल्यावर बलात्कार झाल्याचं लिहिलंय. त्यात तिने पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेचं नाव लिहिलंय. पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेनं चारवेळा बलात्कार केल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. तसंच प्रशांत बनकर नावाच्या व्यक्तीनेही मानसिक त्रास दिल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटलंय.

आरोग्य विभागातील वरिष्ठ आणि पोलिसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचं पीडितीने आपल्या सुसाईट नोटमध्येस म्हटलं आहे. तसेच या प्रकरणी पोलीस उपाधिक्षांकडे तक्रार करुनही त्यांनी दखल घेतली नसल्याचं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

Dhananjay Munde : महिला डॉक्टर बीडची मुंडे असल्याने वरिष्ठांनी तक्रार डावलली असेल तर गंभीर, SIT चौकशी करा; सातारा प्रकरणावर धनंजय मुंडेंची मागणी

आणखी वाचा

Comments are closed.