ढोबळी मिरचीच्या रोपांमध्ये शेतकऱ्याची फसवणूक, 50 लाख रुपयांचं नुकसान, रोपवाटिकेविरोधात संताप
सातारा : सातारा (satara) जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील खटाव तालुक्यात औंध येथील शेतकरी जयवंत जगदाळे यांची ढोबळी मिरचीच्या ( chilli) रोपांमध्ये मोठी फसवणूक झाली आहे. सुमारे 50 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्याने दिली आहे. सांगली जिल्ह्यातील सिद्धेवाडीखण येथील वाघमोडे हायटेक रोपवाटिकेतून घेतलेल्या इंडस 11 आणि प्रोफेसर या वाणांची एकूण 48 हजार रोपे निकृष्ट आणि बोगस निघाल्याचा आरोप शेतकरी जयवंत जगदाळे यांनी केला आहे.
30 दिवसात रोपांना कळी लागणे आवश्यक, मात्र सहाव्या दिवशीच कळी लागली
जयवंत जगदाळे यांनी डिसेंबर महिन्यात साडेपाच एकर क्षेत्रात ढोबळी मिरचीची लागवड केली होती. अपेक्षेप्रमाणे 30 दिवसात कळी लागणे आवश्यक होते, मात्र रोपांना सहाव्या दिवशीच कळी लागली, जी नैसर्गिक प्रक्रियेविरोधात होती. त्यानंतर सतत रोपांची वाढ खुंटत गेली. शेतकऱ्यांनी वारंवार रोपवाटिका मालकाशी संपर्क साधून प्लॉट पाहणीची विनंती केली. परंतू मालकाकडून टाळाटाळ झाली. 76 दिवस उलटून गेले तरीही रोपांची वाढ झाली नाही. यामागे रोपवाटिकेने ग्रोथ रेग्युलेटर वापरल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. यासंदर्भात पंचायत समितीकडे तक्रार दाखल केल्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी रमेश देशमुख आणि इतर तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी शेतावर जाऊन पंचनामा केला आणि नुकसान भरपाईची ग्वाही दिली. मात्र, अद्याप या शेतकऱ्याला कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही.
सुमारे 50 लाख रुपयांचे नुकसान
शेतकऱ्याने अत्यंत महागडी बियाणं, खत, औषध, मजुरी यावर सुमारे 10 लाख रुपयांचे थेट भांडवल खर्च केले आहे. जर रोपे दर्जेदार असती तर एकरी उत्पन्न 25 ते 30 लाख रुपये मिळाले असते. सध्या तरी एकही रुपयाचे उत्पादन या शेतकऱ्याला मिळालेले नाही. त्यामुळं शेतकरी जयवंत जगदाळे यांचे सुमारे 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, रोपांची वाढ होत नसल्याने शेतकरी जगदाळे यांनी वारंवार रोपवाटीका मालकाला फोन केला होता. मात्र, त्यांनी दुल्रक्ष केल्याचे पाहायला मिळाले. जगदाळे यांनी रोपवाटिका मालकाशी संपर्क साधून प्लॉट पाहणीची विनंती देखील केली होती. परंतू मालकाकडून टाळाटाळ करण्यात आल्याची माहिती शेतकरी जयवंत जगदाळे यांनी दिली आहे. 76 दिवस उलटून गेले तरीही रोपांची वाढ झाली नाही. त्यामुळं शेतकऱ्याची चिंता वाढली होती. अखेर या ठोबळी मिरचीची रोपं वाया गेल्याचं पाहायला मिळालं.
https://www.youtube.com/watch?v=vnct4bid0fe
महत्वाच्या बातम्या:
Farmer Success Story: व्यवसायात नुकसान; युवा शेतकऱ्याने धरली शेतीची कास; चिकू आणि खरबूजच्या लागवडीतून लाखोचे उत्पन्न
अधिक पाहा..
Comments are closed.