महिला राखीव जागेवर पुरुषाचे नामनिर्देशन पत्र दाखल, छाननीत अर्जही वैध; राजकीय क्षेत्रात खळबळ
Satara nagarpalika Election : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सातारा नगरपालिकेच्या (Satara nagarpalika Election) प्रभाग क्रमांक तीनमध्ये ३ ब सर्वसाधारण महिलासाठी राखीव असून या जागेवर एका पुरुषाने नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. आज छाननीतही हा अर्ज वैध झाल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
प्रभाग क्रमांक तीनमध्ये 3 ब सर्वसाधारण महिला राखीव जागा आहे
प्रभाग क्रमांक तीनमध्ये 3 ब सर्वसाधारण महिला राखीव जागा आहे. या जागेसाठी एकूण ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ६ महिला असून त्यात एका पुरुषाचा उमेदवार अर्ज दाखल झाल्याची बाब भाजपचे माजी शहराध्यक्ष व नगरपालिका प्रभारी यांनी निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे एका पुरुषाचा महिला राखीव जागेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल होत असताना निवडणूक निर्णय अधिकारी नेमके करत होते काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महिलेसाठी जागा आरक्षित असताना एका पुरुषाचा अर्ज दाखल करून घेणे ही बाब अत्यंत गंभीर
सर्वसाधारण महिलेसाठी ही जागा आरक्षित असताना एका पुरुषाचा अर्ज दाखल करून घेणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यातच आजच सर्व उमेदवारांची प्रभाग निहाय छाननी झाली आहे. मात्र, या छाननीमध्ये ही बाब निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात न आल्याने नेमकी चूक कोणाची झाली? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.