धक्कादायक! साताऱ्यात डॉक्टरांच्या बनावट सही शिक्क्याचा वापर करुन विमा कंपनीची फसवणूक, चौघांवर
सातारा क्राइम न्यूज: साताऱ्यातील (satara) फलटण तालुक्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डॉक्टरांच्या बनावट सही शिक्क्याचा वापर करून विमा कंपनीची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील एकाला फलटण तालुका पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर तिघांचा पोलीस शोध घेत आहेत.
डॉक्टरांच्या तक्रारीवरून फलटण पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला
खामगाव येथील डॉ. ब्रह्मानंद टाले या पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरांच्या तक्रारीवरून फलटण पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अतिशय धक्कादायक बाब म्हणजे फलटण येथे डॉ. ब्रह्मानंद टाले यांची बनावट सही आणि नोंदणी क्रमांक वापरून हे भामटे रक्त चाचणीचे रिपोर्टही देत होते. 5 ऑगस्ट 2025 रोजी “बुलेट हेल्थकेअर सर्व्हिसेस फॉर रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स” कंपनीचे प्रतिनिधी यांनी खामगाव येथे येऊन डॉ. ब्रह्मानंद टाले यांना काही रक्त चाचणीचे अहवाल दाखवले व हे तुम्ही प्रमाणित केले आहे का? असं विचारल असता डॉ. ब्रह्मानंद टाले यांना शंका आली आणि हे रिपोर्ट मी प्रमाणित केले नसल्याचे सांगत यावर माझी बनावट स्वाक्षरी व बनावट नोंदणी क्रमांक असल्याचे विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितलं. या अहवालावर डॉ. ब्रह्मानंद टाले हे चालवत असलेल्या धन्वंतरी पॅथॉलॉजी लेबलोटरी च नाव व बनावट स्वाक्षरी आणि बनावट नोंदणी क्रमांक असल्याच आढळलं.
बनावट सही व बनावट नोंदणी क्रमांक वापरून रक्ताचे खोटे अहवाल केले तयार
यावरुन फलटण येथील डॉ. बी. जे.राऊत, फलटण येथीलच धन्वंतरी लॅबोरेटरी साखरवाडी चे चालक विशाल एम नाळे, श्रीराम हेल्थ केअर सर्विसेस लाब्रोटरी इंदापूरचे चालक शंकर खडसे व प्रतिभा सोळुंके यांच्याविरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली यावरून पोलिसांनी डॉ. ब्रह्मानंद टाले यांचे नाव,बनावट सही व बनावट नोंदणी क्रमांक वापरून रक्ताचे खोटे अहवाल तयार केल्याप्रकरणी वरील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.हा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी या चौघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 34, 420, 465, 438,471 नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, यामधील एका आरोपीला फलटण तालुका पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर तिघांचा पोलीस शोध घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
फिल्मी स्टाईलने 2 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न अन् 500 कोटींच्या बोगस औषधांचा पर्दाफाश; झोपेची गोळी, जी घेतल्यानंतर झोपच येत नाही! महाराष्ट्रातही विक्री
आणखी वाचा
Comments are closed.