Satara Pandavgad bee attack in wai satara 6 injured
सातारा : महाराष्ट्रातील गडकिल्ल्यावर तसेच अशा अनेक पर्यटनस्थळी शनिवार रविवारचा बेत साधून असंख्य गिर्यारोहक फिरण्यासाठी जातात. अनेकदा ट्रेकिंगसाठी गेलेल्या गिर्यारोहकांना काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज असते. अशामध्ये अनेकदा गिर्यारोहकांना मधमाशांचा हल्ल्याचा सामना करावा लागतो. असाच एक प्रकार सातारा जिल्ह्यातील पांडवगडावर झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये 6 गिर्यारोहक जखमी झाले असून यातील 2 गिर्यारोहक हे जागेवरच बेशुद्ध पडले होते. यावेळी या सर्व जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. (Satara Pandavgad bee attack in wai satara 6 injured)
हेही वाचा : Suresh Dhas : ज्यांनी अक्षय शिंदेची बाजू घेतली, त्यांनी आम्हाला शिकवू नये; धसांनी आव्हाडांना सुनावले
सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील पांडवगडावर गिर्यारोहकांवर मधमाशांनी हल्ला चढवल्याने परिसरात आणि गडावर एकच खळबळ उडाली. यामध्ये 2 गिर्यारोहक हे घटनास्थळावर बेशुद्ध पडले तर याशिवाय आणखी 4 गिर्यारोहक हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना वाईमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसारगिर्यारोहक हे इंदापूरवरून पांडवगडावर ट्रेकिंग करण्यासाठी आले होते. मधमाशांच्या अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या गिर्यारोहकांमध्ये गोंधळ उडाला. समोर आलेल्या माहितीनुसार, गिर्यारोहकांनी लावलेल्या परफ्यूमच्या वासाने मधमाशांच्या पोळे विचलित झाल्याने मधमाशांनी गिर्यारोहकांवर हल्ला केला. यामध्ये एकूण 6 गिर्यारोहक गंभीर जखमी झाले. त्यामध्ये 2 जण बेशुद्ध झालेले आहेत. ही माहिती मिळताच वाई येथील गिर्यारोहक प्रशांत डोंगरे, शिवसह्याद्री बचाव पथक आणि सहकाऱ्यांनी पांडवगडावर धाव घेतली. प्रशासनाला याची माहिती कळवण्यात आली. सर्वांना पुढील उपचारासाठी वाई ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.
या ठिकाणी मधमाशांचा हल्ला झाल्याच्या घटना
माधामंशाचा हल्ला झाल्याच्या आणखी दोन घटना घडल्याचे समोर आले आहे. लोणावळ्यात एकविरा गडाच्या पायथ्याशी काही हुल्लडबाजांनी फटाके फोडले. त्यामुळे झालेल्या धुराने परिसातील मधमाशांना त्रास झाला आणि त्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. तसेच, सिंहगडावरही मधमाशांनी हल्ला केल्याचे समोर आले आहे. सिंहगडाच्या कल्याण दरवाज्याजवळ पर्यटक गेले होते. यावेळी कल्याण दरवाजाच्या तटबंदीखाली कड्यावर असलेल्या मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला.
Comments are closed.