Satej Patil statement regarding felicitating Girish Mahajan if he gives his beloved sisters a year worth of money
काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी निवडणुकीच्या आधी पात्र असलेल्या महिला आता अपात्र कशा काय ठरवल्या जात आहेत? जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीने त्यावेळी पात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणी आज सावत्र कशा वाटायला लागल्या? असे प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केले. याचवेळी त्यांनी लाडक्या बहिणींना पुढील वर्षभराचे पैसे आता द्या, तुमचा जाहीर सत्कार करतो, असे आव्हानही भाजपा नेत्याला केले.
मुंबई : लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यानंतर राज्यातील अडीच कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेत निकष लावले जातील, अशी चर्चा सुरू झाली आणि लाभ घेणाऱ्या महिलांना आपले अर्ज मागे घेतले. या योजनेतून कमी झालेल्या महिलांची संख्या आता 9 लाखांवर पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर आज (5 मार्च) काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी निवडणुकीच्या आधी पात्र असलेल्या महिला आता अपात्र कशा काय ठरवल्या जात आहेत? जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीने त्यावेळी पात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणी आज सावत्र कशा वाटायला लागल्या? असे प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केले. याचवेळी त्यांनी लाडक्या बहिणींना पुढील वर्षभराचे पैसे आता द्या, तुमचा जाहीर सत्कार करतो, असे आव्हानही भाजपा नेत्याला केले. (Satej Patil statement regarding felicitating Girish Mahajan if he gives his beloved sisters a year worth of money)
लक्षवेधीचा मुद्दा उपस्थित करताना सतेज पाटील म्हणाले की, ज्यावेळी लाडकी बहीण योजना सुरू झाली होती, त्यावेळी राज्य शासनाने 10 जीआर काढले होते. खरं तर त्यावेळी ही योजना राजकीय उद्देश ठेऊन सुरू करण्यात आल्याचे आता स्पष्ट होत आहे. लोकसभेला फटका बसल्यावर त्याचा उतारा म्हणून ही योजना काढली आहे. महायुती सरकारचं लाडक्या बहिणींवर कधीच प्रेम नव्हतं. भाऊबिजेला लाडकी बहीण आठवली, त्यावेळी दोन महिन्यांचे पैसे दिले होते. परंतु निकालानंतर ते पैसे थांबवण्यात आले. सरकारकडून आज जे निकष सांगितलं जात आहेत, ते आधीपासूनच आहेत. त्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीची होती. स्थानिक ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांना निकषाचे अधिकार देण्यात आले होते. असे असतानाही त्यावेळी पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणी आज अपात्र कशा ठरवल्या जात आहेत? त्यांची फसवणूक का केली जात आहे का? त्यावेळी लाडकी बहीण वाटलेली आज सावत्र कशी झाली? असा प्रश्नांचा भडीमार त्यांनी केला.
हेही वाचा – Ladki Bahin Yojana : यंदा 2100 रुपये देऊ अशी घोषणा नाही, योजनेबाबत आदिती तटकरेंकडून खुलासा
पुढच्या वर्षभराचे पैसे दिले तर जाहीर सत्कार करतो
सरकारवर निशाणा साधताना सतेज पाटील म्हणाले की, या राज्यात अशी एकही योजना नाही की, ज्याचे पैसे आधीच्या महिन्यात दिले जातात. पण या योजनेचे पैसे फक्त राजकीय फायद्यासाठी आधी देण्यात आले, असे म्हणत सतेज पाटील यांनी राज्याचे मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे पाहिले. गिरीश महाजन यांना उद्देशून सतेज पाटील म्हणाले की, आता जर तुमच्यात ताकद असेल तर पुढच्या वर्षभराचे पैसे आताच एकत्रित द्या. पुढच्या वर्षभराचे पैसे तुम्ही जर एकत्रित दिले तर कोल्हापुरात तुमचा जाहीर सत्कार करतो, असे आव्हानच सतेज पाटील यांनी सभागृहात दिल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा – Aditi Tatkare : दोन योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांवर कारवाई करणार का? आदिती तटकरेंनी दिले उत्तर
Comments are closed.