तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल, मुंबईतल्या साठ्ये महाविद्यालयातली धक्कादायक घटना

तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून एका विद्यार्थिनीने आपले जीवन संपवले आहे. मुंबईच्या साठ्ये महाविद्यालयातली ही धक्कादायक घटना घडली आहे. तिने हे पाऊल का उचलले याचे कारण कळालेले नाही.
मृत मुलीचे नाव संध्या पाठक असून ती 21 वर्षांची होती. संध्या साठ्ये महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात होती. आज ती कॉलेजमध्ये आली आणि तिसऱ्या मजल्यावर गेली. तिसऱ्या मजल्यावर जाताना ती सीसीटीव्हीमध्येही दिसत होती. तिसऱ्या मजल्यावरून तिने उडी मारली आणि गंभीर जखमी झाली. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले.
असे असले तरी आपल्या मुलीला कुणीतरी ढकलले असावे असा संशय संध्याच्या पालकांनी व्यक्त केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Comments are closed.