Satish Bhosale – ‘खोक्या’चं पार्सल तुरुंगात; 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, न्यायालयात सुनावणीवेळी काय झालं?

भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता, कुख्यात गुंड तथा हरणतस्कर सतीश भोसले उर्फ खोक्याभाऊ याला न्यायालयाने 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शिरूरच्या तालुका कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

एका व्यक्तीला अमानुष मारहाण करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सतीश फोसले फरार झाला होता. त्याला उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून अटक करण्यात आली होती. बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत खोक्याभाऊच्या मुसक्या आवळव्या होत्या. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून बीड पोलीस त्याला महाराष्ट्रात घेऊन आले.

शुक्रवारी पहाटे त्याला छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आणण्यात आले आणि तिथून बीडमधील शिरूर कासार येथे नेण्यात आले. तिथे त्याची वैद्यकीय चाचणी करून दुपारच्या सुमारास त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची 7 दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

‘खोक्याभाई’ सतीश भोसलेचं घर जाळलं? परिवाराची काय चूक? अंजली दमानिया यांची पोस्ट

Comments are closed.