मोठी बातमी: जुन्नरजवळ मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू, जरांगेंच्या उपोषणापूर्वी मोठी दुर्घट

सतीश देशमुख मृत्यू: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं यासाठी काल (27 ऑगस्ट) अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. आज सकाळी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आता शिवनेरीवर पोहचले. यानंतर मनोज जरांगे पाटील आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.  मात्र याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुन्नरजवळ मराठा आंदोलकाचा हार्टअटॅकने मृत्यू झाला आहे. सतीश देशमुख असं मृत व्यक्तीचं नाव असून मुंबईतील मनोज जरांगेंच्या उपोषणापूर्वीच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मनोज जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलनासाठी 8 तासांची वेळ-

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी 8 तासांची वेळ दिलीये. पोलिसांना हमी देत जरांगेंनी ही वेळ मान्यही केलीये…मात्र शिवनेरीत पोहोचल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वेगळीच भूमिका घेणार की काय असं दिसून आलं. त्यामुळे मनोज जरांगे आणि मराठा बांधव आता प्रशासनानं दिलेली 8 तासांची वेळ पाळणार की वेळेवर आणखी कोणती वेगळी भूमिका घेणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच अटीशर्ती काढा अशी मागणी मनोज जरांगेंनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=A2J7ENOBRSW

संबंधित बातमी:

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: शिवनेरी किल्ल्यावरुन तुम्हाला शब्द देतो…; मुंबईत पोहचण्याआधी मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना स्पष्टच सांगितले!

आणखी वाचा

Comments are closed.