रांकीरेड्डी-शेट्टीचा विजयी धडाका कायम

हिंदुस्थानच्या स्टार बॅडमिंटनपटू सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने ‘चायना मास्टर्स सुपर 750’ या बॅडमिंटन स्पर्धेत विजयाचा धडाका कायम राखला आहे. पुरुष दुहेरी प्रकारात सात्त्विक आणि चिराग या जोडीने चीनच्या रेन झियांग यू आणि शिया हाओनन या जोडीता 21-14, 21-14 असा पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पॅरिसमधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अलीकडेच दुसरे कांस्यपदक जिंकणारे सात्त्विक आणि चिराग जोडीला हाँगकाँग ओपनमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. सात्त्विक आणि चिराग या जोडीचा उपांत्य फेरीतील सामना हा दुसऱ्या क्रमांकाचे मानांकित मलेशियाचे आरोन चिया आणि सोह वूई यिक या जोडीशी होऊ शकतो. यापूर्वी, हिंदुस्थानची स्टार शटलर पी. व्ही. सिंधूची जागतिक नंबर वन आन से यंगविरुद्ध निराशाजनक कामगिरी कायम राहिली. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये कोरियन खेळाडूकडून सरळ गेममध्ये तिला पराभव पत्करावा लागला.

Comments are closed.