Satyacha Morcha Live Update – राज ठाकरे दादरहून लोकलने चर्चगेटच्या दिशेने रवाना

मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळाबद्दल निवडणूक आयोगाचा निषेध नोंदवून लोकशाहीचा आणि खऱ्या मतदारांचा आवाज बुलंद करण्यासाठी आज सर्वपक्षीय महामोर्चा मुंबईत निघणार आहे. असत्याविरोधात सत्याचा आवाजच यावेळी घुमणार असून या धडक मोर्चाला लाखोंची गर्दी उसळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह काँग्रेस तसेच डाव्या पक्षांचे वरिष्ठ नेते या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.

Comments are closed.