सत्यजित रे यांचा 56 वर्षे जुना चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित, ‘अरण्येर दिन रात्रि’ प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतोय
अमेरिकेत 1970 चा बंगाली चित्रपट ‘अरण्येर दिन रात्रि’ डिजिटल अवतारात री-लाँच करण्यात आला आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्या या चित्रपटाला नवीन 4के रूपात मॅनहॅटनमधील प्रसिद्ध आर्ट-हाऊस सिनेमागृह ‘फिल्म फोरम’मध्ये दोन आठवडय़ांसाठी पुन्हा दाखवला जात आहे.
गेल्या वर्षी न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला होता आणि आता तो सामान्य प्रेक्षकांसाठी खुला झाला आहे.
जुने चित्रपट जतन करणारी संस्था ‘द फिल्म फाऊंडेशन’, ‘फिल्म हेरिटेज फाऊंडेशन’ आणि ‘जानस फिल्म्स’ यांनी मिळून याचे नव्या रूपात जतन केले. कोलकात्याच्या शहरी वातावरणात राहणाऱया चार मित्रांची ही कथा आहे. उच्च जातीय, सुशिक्षित, इंग्रजी बोलणाऱया अशीम, संजय, हरी आणि शेखर या अविवाहित तरुणांची ही कथा आहे. चौघे शहराच्या गोंगाटापासून दूर झारखंडमधील पलामूच्या जंगलात सहलीला जातात. पुरुषी सत्ता आणि जातीय अहंकाराच्या कथेवर आधारित ‘अरण्येर दिन रात्रि’ 1970 मध्ये जितका प्रासंगिक होता, तितकाच आजही अचूक आहे.
Comments are closed.