शरद पवारांना मोठा धक्का; सत्यजितसिंह पाटणकर भाजपात प्रवेश करणार, पाटणमध्ये नवा राजकीय भूकंप
सत्यजितसिंग पटंकर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी शरद पवार (Sharad Pawar) यांना मोठा धक्का बसला आहे. साताऱ्यातील पाटण तालुक्यातील सत्यजितसिंह पाटणकर (Satyajit Singh Patankar) आज (10 जून) सकाळी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
सत्यजितसिंह पाटणकर आज भाजपात आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत पक्षप्रवेश करणार आहे. भाजप कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थित सत्यजितसिंह पाटणकरांचा भाजपात पक्षप्रवेश होणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापनदिन आहे. मात्र यावर्धापनदिनी भाजपकडून शरद पवारांना धक्का देण्यात आला आहे. 26 मे 2025 रोजी पाटणमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत सत्यजित सिंह पाटणकर यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांचा प्रभाव केला कमी-
सातारा जिल्ह्यातील पाटणमध्ये गेली अनेक दशके देसई आणि पाटणकर घराण्यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र 2014 पासून शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघात सलग विजय मिळवत सत्यजितसिंह पाटणकरांचा प्रभाव कमी केला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत देखील शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकरांचा पराभव केला होता.
2014 पासून पाटण विधानसभेत शंभूराज देसाईंचे वर्चस्व-
पाटण विधानसभा मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रमसिंह पाटणकर यांनी शंभूराज देसाई यांना पराभूत केलं होतं. त्यानंतर 2014 ची निवडणूक सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे लढवली. यावेळी शंभूराज देसाई यांनी विक्रमसिंह पाटणकर यांचा पराभव केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सत्यजितसिंह पाटणकर यांनी शंभूराज देसाईंविरुद्ध निवडणूक लढवली. शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांना पराभूत करत विजय मिळवला होता. 2024 मध्ये देखील शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांचा पराभव केला.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.