सौदीमध्ये सहा महिन्यांत 217 जणांना फाशी, ड्रग्ज तस्करीच्या विरोधात मोठी मोहीम

कठोर कायदे आणि त्या कायद्यांच्या कठोर अंमलबजावणीसाठी ओळखल्या जाणाऱया सौदी अरेबियाने गेल्या सहा महिन्यांत तब्बल 217 जणांना फासावर लटकवले आहे. यात ड्रग्ज प्रकरणातील 144 आरोपींचा समावेश आहे. फाशी झालेल्या व्यक्तींमध्ये 121 विदेशी नागरिक आहेत.

सौदी अरेबिया सरकारने 2023 पासून ड्रग्ज तस्करीच्या विरोधात व्यापक मोहीम उघडली आहे. देशात व देशाच्या सीमेवर संशयितांची धरपकड सुरू आहे. चौकशीत दोषी आढळलेल्या लोकांवर खटले चालवून त्यांना शिक्षा दिली जात आहे. ड्रग्ज प्रकरणात 2022 मध्ये 19 लोकांना फाशी देण्यात आली होती. 2024 मध्ये हा आकडा 117 होता.

मानवी हक्क संघटनांचा आरोप

सौदीमध्ये मोठय़ा संख्येने लोकांना फासावर लटकवले जात असल्याबद्दल मानवी हक्क संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. विदेशी नागरिकांना योग्य कायदेशीर मदत मिळत नाही. त्यामुळे ते सहजच शिक्षेस पात्र ठरत आहेत. अॅम्नेस्टी इंटरनॅशनल आणि रिप्रीव्हसारख्या संघटनांनी या घटना धक्कादायक आणि अमानुष असल्याचे म्हटले आहे.

Comments are closed.